Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गावांच्या परिवर्तनासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

=

   महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : गावाच्या परिवर्तनासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पुढाकार घेत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावांमध्ये सर्वसोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची आढावा बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, अभियानाचे व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, प्रवीण पिंजरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. आर. पाटील आदींसह सर्व यंत्रणांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गावांचा विकासाबरोबरच त्यांचे परिवर्तन करणे आवश्यक आहे. गाव कृती आराखडा करताना सर्वांगीन गावचा विकास होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. यासाठी अभियानातील जलदूत, समुदाय सहाय्य संस्थान, जलयोद्धे आदींना सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. त्यातून गावांचा कायापालट करावा. कृती आराखड्यातील गावांना ‘हर घर नल से जल’ या प्रमाणे मुबलक पाणी मिळेल यासह नळजोडणीची कार्यवाही करून नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. पिंजरकर आणि श्री. बयास यांनी अभियानांतर्गत करण्यात येत असलेली आणि करावयाची कामे याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. तर विद्यापीठाचे श्री. पाटील यांनी रासेयोतून अभियानासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत असून आठ गावांमध्ये रासेयोचे विद्यार्थी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील इतर योजनांचाही श्री.चव्हाण यांनी सविस्तर आढावा घेत सूचना केल्या.

*****

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close