Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शिवसेनेशी जुळवून घ्या,आपल्याला कायम एकत्र राहायचंय ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांचची सूचना


मुंबई /प्रतिनिधी
शिवसेनेशी जुळवून घ्या,आपल्याला कायम एकत्र राहायचंय आशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिल्या आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संकेत महत्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले की, आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या.अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या.मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदरांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close