Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

mh20live Network

बिलगाव येथील धबधब्यात बुडुन मृत्यू, दुपारी दोनच्या सुमारास घडली घटना

नंदूरबार :आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्यामध्ये बुडुन मृत्यू झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे महामंत्री अनिकेत ओव्हाळ संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी धडगाव तालुक्यात आले होते. त्यानंतर अनिकेत आपल्या सहा मित्रांसमवेत आज सकाळी बिलगाव धबधबा पाहण्यासाठी गेले. दुपारी दोनच्या सुमारास अंघोळीसाठी पाण्यात गेल्यानंतर परतत असताना त्यांचा पाय घसरला. पाय घसरल्यानंतर ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र विराज ठाकरे यांनी धाव घेतली. मात्र तेदेखील पाण्यात बुडत असल्याने त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घटनेत ‘एव्हीबीपी’चे महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर अशोक लटपटे या त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीवरून त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह सध्या धडगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close