Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अजोय मेहता यांनी घेतली महारेराचे अध्यक्ष म्हणून शपथ

अजोय मेहता यांनी घेतली महारेराचे अध्यक्ष म्हणून शपथ

            मुंबई दि. १५ : माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष म्हणून मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व इतर कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम 2017 मधील नियम 9(1) व 9(2) मधील तरतुदीनुसार श्री.मेहता यांना शपथ देण्यात आली.

           यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तथा माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close