Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

सतीश चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयानंतर परळीत फटाके फोडून जल्लोष

MH20LVE NETWORK


परळी वैजनाथ /समिर इनामदार

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर परळी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतील पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी सतिश चव्हाण यांच्या सलग तिसऱ्या विजयनिमित्त अभिनंदन केले असून यासाठी श्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्वच नेतेगण, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा जनतेने महाविकास आघाडीच्या एकजुटीबद्दल तसेच आजवर केलेल्या कामाची पावती व पसंती दिल्याची साक्ष असल्याचे मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सतीश चव्हाण यांचा विजय घोषित होताच फटाके फोडून जल्लोष केला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close