Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला भेटायला बोलावले ,पुढे धक्कादायक का केले आहे

नागपूर/ऋषी काटवुले

नागपूर शहरा मध्ये दिवसान दिवस गुन्हे चे प्रमाण वाढत आहे, एक पाऊल स्मार्ट सिटी म्हणुन पण नागपूर ची ओळख निर्माण होत आसतानाच या राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहण्यास मिळत आहे. राज्यात सत्तांतर झाले मात्र नागपूरच्या परिस्थितीत काही बदल झालेला पहायला मिळत नाही. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवरून चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर तरुणी गंभीर जखमी झालेली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार सकाळी 10.30 च्या सुमारास मृणाली ( पीडित ) ही आरोपी प्रशांत बरसागडे याला भेटायला आली होती. त्यावेळी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणांवरून वाद झाला आणि दोघांची रस्त्यावर बाचाबाची झाली. काही कळायच्या आता रागाच्या भरात प्रशांतने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने मृणालीवर चाकूने सपासप वार केले. चाकूचे वार वर्मी बसल्यामुळे मृणाली जागेवरच कोसळली. स्थानिकांनी धाव घेऊन मृणालीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.

आरोपी प्रशांत आणि मृणालीमध्ये प्रेमसंबंध होते. पण, काही दिवसांपूर्वी मृणालीने प्रशांतपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती प्रशांतसोबत बोलत नव्हती. अखेर आज सकाळी प्रशांतने तिला भेटायला बोलावले असता रागाच्या भरात चाकूने हल्ला केला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी मृणालीचा पोलिसांनी जाब घेतला आहे. आरोपी प्रशांत बरसागडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close