Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नमस्ते संभाजीनगरचा पोस्टर लावल्यानंतर शिवसेना भाजपात जुंपली

भाजपवर बरसले दानवे, औरंगाबादकरच त्यांना करणार नमस्ते…!

औरंगाबाद:काल शहरात नमस्ते संभाजीनगरचा पोस्टर भाजयुमोच्या वतीने झळकल्यानंतर शिवसेनेत संताप व्यक्त होत आहे. संभाजीनगरच्या मुद्दयावर भाजपा शिवसेनेत आता जुंपली आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे एका बैठकीत भाजपावर बरसले आहे. त्यांनी अक्रामक होवून आपल्या भाषणात टिका केली आहे. त्यांनी भाषणात सांगितले काही लोक जाणून-बुजून या ऐतिहासिक शहराचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या विषयामुळे त्यांचा ढोंगीपणा , खरा चेहरा जनतेसमोर येत आहे या विरोधकांना आता औरंगाबादकरच नमस्ते करणार असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या चालू असलेल्या ढोंगी घडामोडींचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेनेच्या वतीने शहरात उपशहरप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बैठकांचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकांमध्ये मतदार नोंदणी, सदस्य नोंदणी, त्याचप्रमाणे मतदार यादी पान प्रमुख यांच्या नियुक्त्या याबाबत आढावा घेऊन त्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. बोलताना आमदार दानवे म्हणाले की
निवडणूका येत राहतील जात राहतील शिवसेनेला संघर्ष करण्याची, जनतेची कामे करण्याची, समाजसेवा करण्याची सवय झाली आहे यामुळेच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतो आणि राहीलही
पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावला असून आपण गुंठेवारी भागातील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेने शिवसेना गुंठेवारी मदत केंद्र स्थापन करून नागरिकांच्या गुंठेवारीतील घरे नियमीत संबंधित प्रश्न मार्गी लावावेत. त्याचप्रमाणे 23 जानेवारी रोजी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह भर विविध उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात प्रत्येक वार्डात जयंती साजरी करावी असे आवाहन आमदार दानवे यांनी केले. आज नारेगाव, मिसारवाडी, चिकलठाणा , चिकलठाणा एमआयडीसी ,मुकुंदवाडी, रामनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अंबिकानगर या विभागाची बैठक घेण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी केले. बैठकीत शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, युवासेना सचिव राजेंद्र जंजाळ यांनीही मार्गदर्शन केले. शहरप्रमुख बाबासाहेब डांगे यांनी मान्यवर व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी बैठकीस उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे, बन्सिलाल गांगवे मामा, भाऊसाहेब वाघ, मा. नगरसेवक मनोज गांगवे, कमलाकर जगताप, मनिष दहीहंडे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, रमेश दहीहंडे, विभाग प्रमुख लक्ष्मण पिवळ, विष्णु गुंठाळ, सोमनाथ नवपुते, संतोष लिंबेकर, पंडीत बोरसे, सतीश काळे, विजय गावडे, कृष्णा मेटे, दिपक सुर्यवंशी,
भाऊसाहेब राते, विशाल सानप,
युवासेनेचे शहरसंघटक हनुमान शिंदे, सतीष पवार, अवधूत अंधारे, प्रशांत कुर्हे, भुषण बकाल, भागीनाथ रिठे, समाधान पाटील, सुरेश प्रसाद, किशोर हनवते, शुभम वाघ, सागर शिरे, संजय कोरडे, रामेश्वर कोरडे, सतीश वाघ, रुपेश मालाणी, संजय मनमाडकर, दत्तु देहाडराय, नारायण बरकाशे, महीला आघाडीच्या दुर्गा भाटी, मा.महापौर सुनंदा कोल्हे, रेखा शहा, लता पवार, भागुबाई शिरसाठ, गौराबाई जाटवे, बत्ताशे मावशी,.वानरे ताई, सुनिता खुर्दे, वनिता खरे, व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close