Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

विवाहानंतर पुरुषांनी ‘असा’ घ्या आहार, चाळीशी नंतरही घेता येईल सळसळत्या तारुण्यांचा अनुभव…

स्टॅमिना एक अशी ताकद असते ज्यामुळे आपण दिवसभरातील सर्व काम चांगल्या प्रकारे करु शकतो. पण जर चाळीशी नंतर स्टॅमिना कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तुमचे वाढलेले वजन होय. त्यामुळे आधी आपल्याला तुमचे वजन नियंत्रणात आणावे लागेल. तुमचे वजन बरोबर असेल तरच या सर्व गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. काही घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

स्टॅमिना आपल्या आहारावरही अवलंबून असतो. आहारावर अधिक लक्ष द्या. जेवणामुळे शरीराला चांगली उर्जा मिळते. दिवसांतून चार ते पाचवेळा थोड्या वेळाने खाणं चांगले ठरते. पण आपला आहार हा संतुलीत असणे आवश्यक आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि चूकीच्या सवयीमुळे या सर्वाचा वाईट परिणाम आपल्या मनावर होत असतो यामुळेच तणाव वाढत जातो. तसेच वजन वाढल्यामुळे थकवा, नैराश्य या समस्यादेखील वाढत चालल्या आहेत. विविध आजार सुद्धा यामुळे होत आहेत.

आपणास लक्षात येईल की डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर नैराश्य इत्यादी आजार वाढत चालले आहेत. चाळीशीनंतर वाढलेले तुमचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपण काही सोपे उपाय असूकरू शकता आणि ते नियमित केल्यास आपले वजन नियंत्रणात येवू शकते.

१. अक्रोड : अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी असून यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण यामुळे कमी होऊ शकते.

२. तिखट : तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड हे घटक असते. २००११ मध्ये इंग्लड मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात एका व्यक्तीने दररोज ६ ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे म्हणजे तिखटचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन ७ पट वेगाने कमी झाल्याचे दिसून आले होते.

३. काळे सोयाबीन : काळ्या सोयाबीन आपल्या आहारात वापरल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होत असते. तसेच याच्या सेवनाने वजन देखील वेगाने कमी होते. तुमच्या वजनावरही काळ्या सोयाबीनने नियंत्रण मिळवता येते.

४. बटाटे खा : अमिरिकेत झालेल्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की बटाटा खाणे कमरेसाठी सर्वाधिक घातक आहे. परंतु तळलेल्या बटाट्याबद्दल हे सर्व सांगितले गेले होते. भाजलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यावर काळी मिरी लावून घेणे हा खूप चांगला आहार आहे. रक्तदाब ची समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. बटाटे उकडून दह्यासोबत खाल्लेले अधिक चांगले.

५. खरबूज : खरबूजच्या सेवनामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. यामध्ये केवळ ४५ कॅलरी असते. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास खरबूज आरोग्यदायी आहे.

६. कोबी : आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने २० टक्के कॅलरी तुम्हाला कमी करता येतात. दररोज २ कप कोबीच्या पानांचा रस खाल्याने तुम्हाला अधिक मात्रेत व्हिटॅमिन-ए मिळू शकते जे तुमच्यासाठी आवश्यक आहे.

७. पनीर: आपल्या वाढत्या वयाबरोबर तुमचे स्नायू कमजोर होत असतात. आपली पचनप्रक्रिया देखील कमकूवत होत असते. पनीर पासून प्रोटीन मिळते या प्रोटीनपासून आपले स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन देखील नियंत्रणात राहते.

८. अश्वगंधा : अश्वगंधाची स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप महत्वाची भूमिका असते आयुर्वेदात सांगितले आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत देखील होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे प्रमाण ठरवून घेवून तुम्ही याचा समावेश करू शकता.

९. केळी, अंडी : केळ्यात असलेले कार्बोहायड्रेट्स फार उपयोगी असतात. यामुळे एनर्जी वाढवण्यास मदत होत असते. अंडी हे प्रोटिन आणि कॅल्शियमचा चांगले स्त्रोत असतात. यामुळेही स्टॅमिना वाढवण्यास मदत होऊ शकते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close