Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

12 वर्षाच्या प्रतिक्षे नंतर-अखेर पोहनेर जवळील तारुगव्हान बंधाऱ्याची तहान भागली


ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

बीड व परभणी जिल्ह्यातील 21  गावांना मोठा दिलासा

माजलगाव / रविकांत उघडे

सण 2008 ला मान्यता मिळालेल्या व मागील 10 वर्षांपासून संथ गतीने कामाची प्रगती असलेल्या गोदावरी नदीवरील 138 कोटी रुपये किमतीच्या बीड परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारुगव्हान बंधाऱ्याची प्रतीक्षा संपली असून जवळपास सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत त्यामुळे या बंधाऱ्यात ढालेगाव बंधाऱ्यातून आलेले पाणी बंधाऱ्यांची 17 दरवाजे बंद करून  अडवण्यात आले आहे.मागील 24 तासात या बंधाऱ्यात जवळपास 25 टक्के पाणी साठले आहे.व त्याचे बॅकवॉटर पार शुक्लतीर्थ लिंबगाव,अंदापुरी पर्यंत गोदापात्रात पसरले आहे.त्यामुळे गेली 12 वर्षांपासून तहानलेल्या तारूगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्यांची तहान भागली आहे.* तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर 11 मोठे उच्च पातळी बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.अजित पवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला होता,आणि मराठवाड्यासाठी वरदान ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील बाभळी सह सर्व बंधाऱ्यांची कामे पूर्ण होऊन गोदाकाठच्या 25 हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ पण होत आहे सर्व तांत्रिक बाबी आर्थिक अडचणीं व आरोप प्रत्यारोपावर मात करत अजित पवार यांनी किमया साधत मराठवाड्यातील सर्व उच्च पातळी बंधारे पूर्ण देखील केले.परंतु त्यातलाच एक असलेला बीड व परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील  पोहनेर जवळील तारुगव्हान उच्च पातळी बंधारा अपवाद ठरला.या बंधाऱ्याचे काम मागील 10 वर्षांपासून या ना त्या कारणाने रखडले होते.त्यामुळे या बंधाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील बीड व परभणी जिल्ह्यतील 21 गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याचे काम पूर्ण होईल ही आशाच सोडून दिली होती.परंतु सरकार बदलले आणि कामाला गती आली. या सरकार मधील विद्यमान आमदारांनी दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या कामात लक्ष घातले आणि 10 वर्षे रखडलेले काम अखेर मार्गी लागले.मागील 1 वर्षात बंधाऱ्याची गेट बसवण्याचा या कामाने चांगलीच गती घेतली व आज सर्व म्हणजे 17 गेट्स सह  तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम पूर्ण होत आले आहे.त्यामुळे आज या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद करून या प्रकल्पात पाणी अडवता आले.
*12 तासातच 15 कि.मी.मागे बॅकवॉटर आले.*
पाथरी व माजलगाव तालुक्यात मागील चार दिवसात चांगला पाऊस झाला.पाथरी तालुक्यात तर दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली,या पावसात ढालेगाव उच्च पातळी बंधारा 96 टक्के भरला होता त्यामुळे या बंधाऱ्याच्या एका गेट मधून 8000 क्यूसेक ने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते.हे पाणी अगोदर मुदगल येथील बंधाऱ्यात अडवण्याचे नियोजन होते,परंतु ढालेगाव नंतर असलेल्या तारुगव्हान बंधाऱ्याचे सर्व 17 दरवाजे बसवण्यात आलेले असल्याने व तारुगव्हान प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्यामुळे ढालेगाव बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले सर्व पाणी तारुगव्हान बंधाऱ्यात अडवण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे लाभार्थी गावातील सर्व लोक निवांत झोपेत असतांना रात्रीतुन झालेल्या ढालेगाव बंधाऱ्यातील विसर्गाने तारूगव्हाण बंधाऱ्यात अडवण्यात आलेले हे पाणी केवळ 12 तासातच गोदापात्रात पसरले व मागे 15 किमी म्हणजे माजलगाव तालुक्यातील शुक्लतीर्थ लिंबगाव सोंनाथडी व पाथरी तालुक्यातील अंदापुरी गावाजवळ हे बॅकवॉटर येऊन ठेपले. त्यामुळे तारूगव्हाण बंधाऱ्या पासून मागे सोन्नाथडी पर्यंत गोदापात्र पाण्याने दुथडी भरलेले दिसत आहे.अचानक झालेल्या या चमत्कारामुळे हे विलोभनीय दृश्य बघतांना गोदाकाठच्या या लाभार्थी गावांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. 

दोन जिल्ह्यातील 21 गावातील 2100 हेक्टर जमीन सिंचनाखाली.
*बीड व परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पोहनेर गावाजवळील तारूगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रात बीड जिल्ह्यातील पोहनेर पासून अडोळा पर्यंत खातगव्हान, डीग्रस, डाके पिंपरी,मोगरा, शुक्लतीर्थ लिंबगाव,सोंनाथडी, गुंजथडी,सुरुंमगाव गंगामसला ही 11 गावे तर परभणी जिल्ह्यातील ढालेगाव पासून तारुगव्हान पर्यंत कानसुर उमरा अंदापुरी,गौंडगाव,गुंज,मसला खुर्द, मसला तांडा,या दहा गावांचा समावेश असून बीड जिल्ह्यातील 1050 हेक्टर तर परभणी जिल्ह्यातील 1050 हेक्टर अशी 2100 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.या बंधाऱ्याचे काम 2010 ला सुरू करण्यात आले होते व 2020 मध्ये पूर्ण होत आहे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता 15.40 दलघमी असून या प्रकल्पाचे 138 कोटी किंमतीचे मूळ अंदाजपत्रक होते त्या खर्चात वाढ होऊन आता हा खर्च 173 कोटींवर पोहचला असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभाग परभणीचे उप अभियंता एस.एस.हाके यांनी जलजागृती अभियान चे प्रवर्तक प्रभाकर शेटे व ऍड.शिवप्रसाद शर्मा यांचेशी चर्चा करतांना दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close