Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड, सुप्रीम कोर्टात घेतली धाव!

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर पासून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

युजीसीने पत्राद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. त्याबरोबरच,अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देशही युजीसीनं दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेनं या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी दिली आहे.

राज्य सरकारन आधीच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबरच, कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, युजीसी आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांसमोर संभ्रम निर्माण होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close