Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

या अनुषंगाने 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

mh20live Network

रायगड | प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार निसर्ग वादळ अरबी समुद्रातून वेगाने पुढे येत असल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. याच याच पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात खबरदारी म्हणून दि. 3 जून पहाटे 2 वाजेपासून ते पुढील ४8 तास कलम 144 अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, असं पालकमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

संचारबंदीदरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच सुक्षित रहावे. शासनातर्फे वेळोवेळी सूचना मिळतील, तोवर सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील त्यांनी रायगड जिल्हावासियांना केलं आहे.

मच्छिमार बांधवांनीदेखील समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. समुद्र किनारपट्टीवरील व कच्च्या घरात स्थायिक असलेल्या नागरिकांनी गावात सुरक्षितस्थळी आपल्या परिवारासह गुरा-ढोरांनाही सोबत घेऊन जावे, त्यांना एकटे सोडू नये. गावातील नागरिकांनीसुध्दा त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचं तटकरे म्हणाल्या.

जिल्हा प्रशासनास योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. करोनासोबत दोन हात करीत असतानाच हे वादळाचे संकट उभे राहिले आहे. यालाही आपण संयम आणि धैर्याने सामोरे जाऊ. शासन आणि प्रशासन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी जिल्हावासियांना दिला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close