Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

अवैध वाळू साठा व ट्रकवर उस्मानाबाद तहसीलकडून कारवाई

       उस्मानाबाद,‍दि.23- गुजरात मधील तापी येथून अवैधरित्या वाळू आणून शहरातील सांजा रोड येथे विना परवानगी साठा करून ठेवल्याबद्यल संबंधिता विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.वाळु आणि ट्रक ताब्यात घेतला आहे. ही सर्व कारवाई उस्मानाबाद तहसील कार्यालयाने केली आहे.

        उस्मानाबाद शहरालगत असणा-या सांजा रोड  येथे आज  तापी (गुजरात) येथून आलेल्या तीन ट्रक वाहना (क्रंमाक MH 21AU1481,MH 12 FZ 9407 MH 04 HD 1429) मध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आले.संबंधित ट्रक चालकास शासकीय पावतीबाबत विचारणा केली असता संबंधिताने पावती सादर केली परंतु त्यावर खरेदीदाराचे नाव किंवा ग्राहकांचे नाव दिसून आले नाही. तसेच सांजा रोडलगत सार्वजनिक ठिकाणी कोणताही शासकीय परवाना नसताना तेथे अंदाजे 40 ब्रास वाळू साठा व ट्रक मध्ये अंदाजे 15 ब्रास असे एकूण 55 ब्रास त्यांची अंदाजे बाजारभाव प्रमाणे किंमत पंधरा लाख आहे.

          तेथील वाळू व इतर गौण खनिज साठयाचा पंचनामा करुन तहसील कार्यालयाच्या परिसरात घेऊन जाण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दोन ट्रक शहर पोलीस स्टेशन आणि एक ट्रक आनंदनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे.उस्मानाबाद तहसील कार्यालयात  सध्या अवैध गौणखनिज पथक गठीत करुन कारवाई करण्यात येत आहे. आज येथील तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री. देशपांडे, श्री. चिरखे, श्री. काळे व तलाठी श्री समाधान जावळे,श्री. अमोल निरफळ, श्री. रोडगे, श्री. बालाजी लाकाळ,श्री गुजर श्री कानाडे ,श्री आखाडे वाहन चालक श्री जमादार यांच्या पथकानी ही कारवाई केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close