Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

शिवशाही बसला अडवुन चालकास मारहाण करुन बसवर दगड फेक करणाऱ्या आरोपीस पुडंलीकनगर पोलीसांनी दोन तासात अटक केली




औरंगाबाद: दिनांक 01/02/2021 रोजी फिर्यादी नामे सुनिल ज्ञानदेव मोरे वय 38 वर्षे धंदा नोकरी
(बस चालक) रा. शिवाणी खदान, पोस्ट कृषीनगर ता. जि. अकोला यांनी फिर्याद दिली की,
दिनांक 01/02/2021 रोजी 10.30 वाजता अकोला येथुन शिवशाही बस क्रमांक MH06-BW-
3681 घेवुन पुणे येथे जात असतांना औरंगाबाद सिडको बसस्थानक येथुन जालना रोडने
मध्यवर्ती बसस्थानक कडे जात असतांना हायकोर्ट सिग्नल जवळ एक इसम मोपेड स्वार
गाडी क्रमांक MH-20-FT-1597 हा बसच्या समोर येवुन बसला अडवुन बस चालकास म्हणाला
की, तुला बस व्यवस्थीत चालवता येत नाही का असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची
धमकी देवुन बसवर दगड फेक करुन समोरी काच फोडुन नुकसान केले म्हणुन बस चालक
श्री सुनिल मोरे यांच्या फिर्यादी वरुन गु.र.नं. 3312021 कलम 353,338,427,341 भा.द.वी सह
कलम 3 सार्वजनीक मालमत्ता नुकसान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा
तपास पोउपनि श्री प्रभाकर सोनवणे हे करत आहेत.
हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

सदरचा गुन्हा दाखल होताच आम्ही तपास पथकास सदर आरोपीच्या मोपेड गाडी
क्रमांका वरुन अवघ्या दोन तासात शोध घेवुन त्यास पकडले त्यानंतर त्यास त्याचे नाव गाव
विचारले असता त्याने त्याचे नाव राजेंद्र सुनिल कपिले वय 30 वर्षे रा. एन-7, आयोध्यानगर,
औरंगाबाद असे सांगितले त्याने सदरचा गुन्हा केला असल्याने त्यास नमुद गुन्ह्यात तपास
अधिकारी पोउपनि श्री प्रभाकर सोनवणे यांनी अटक केली आहे.
हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

तरी आपणास पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन
करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असतांना कोणीही दहशत
निर्माण करुन वरिल नमुद प्रमाणे कृत्य करु नये सरकारी नोकरावर हल्ला करणे हा
दखलपात्र व अजामीनपात्र अपराध आहे त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या नागरिकांवर कठोर
करवाई होउ शकते व त्यास मा.न्यायालयाकडुन 3 ते 5 वर्षाचा कारावास सुध्दा होऊ शकतो
त्यामुळे नागरिकांना सर्तक राहुन सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानाची वागणुक
द्यावी. व शासकीय कामात अडथळा निर्माण करु ज्ञ असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, श्री निखील गुप्ता, मा.पोलीस उप-आयुक्‍्त
परिमंडळ-2 श्री दिपक गिऱ्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री किशोर नवले यांच्या
मार्गदर्शनाखाली केली आहे.

हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close