Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

जिल्ह्यात खतांची मुबलक उपलब्धता -जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद /mh20live Network

औरंगाबाद जिल्हयास 46 हजार 858 मेट्रीक टन एवढ्या खताचा पुरवठा झाला आहे. याशिवाय जिल्हयात यापुर्वीची खते शिल्लक असुन खतांचे उत्पादन व वाहतूक अत्यावश्यक सेवा म्हणून सुरळीतपणे चालु असल्याने खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

       कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर आगामी खरीप हंगामात खते व बियाणे यांचा शेतकऱ्यांना पुरवठा व नियोजनासाठी 19 मे रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी श्री आनंद गंजेवार, जिल्हा उपनिबंधक दाभशेडे, तंत्र अधिकारी श्री प्रशांत पवार, माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, आरसीएफ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री डेकाते व जिल्हा व्यवस्थापक जाकिर शेख, इफको कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री कुलकर्णी, माफदाचे सचिव प्रकाशचंद मुथा तसेच डीएमओ उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी  पुढे म्हणाले की, औरंगाबाद जिल्हयास मे अखेर 60815 मे.टन इतक्या आवटंनाच्या तुलनेत आजअखेर 46858 मे.टन खतांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये युरीया 15779 मे.टन, संयुक्त खते 18406 मे.टन, एसएसपी 8139 मे.टन, एमओपी 4011 मे.टन व डीएपी 524 मे.टन खतांचा समावेश आहे असल्याचे सांगूण जिल्हाधिाकरी पुढे म्हणाले की लॉक डाऊन असल्याने मध्यंतरी काही रेक येण्यास व हाताळणीसाठी वेळ लागला असल्यामुळे युरीया वगळता इतर खतांचा आवटंनाप्रमाणे पुरवठा झाला आहे. पुढील 12 दिवसात युरीया खताच्या पाच रेक उपलब्ध होणार असुन कृभको व नॅशनल फर्टिलायझर लि. या कंपन्यांच्या दोन रेक पुढील दोन ते तीन दिवसात जिल्हयात येणार आहेत. तसेच जून मध्ये सुध्दा युरीयासह इतर खतांच्या रेक सतत उपलब्ध होतील याबाबत नियोजन व संनियत्रंण तसेच पाठपुरावा कृषि विभागाकडून करण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close