Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमहाराष्ट्र

अ.भा.छावा संघटना आक्रमक : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवुन पोलीस भरती रद्द करा

नसता जिल्ह्यात तिव्र आंदोलन – जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत

पैठण तहसिलवर गाढवाची धिंड काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध

पैठण / किरण काळे
राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली असा संशय व्यक्त करत निष्काळजी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा आरक्षण स्थगिती उठवा व पोलीस भरती तात्काळ रद्द करा नसता औरंगाबाद जिल्ह्यात अ.भा.छावा संघटनेच्या वतिने तिव्र आंदोलनाला सुरूवात करू आसा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी प्रशासनाला दिला आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या,आरक्षणावरील स्थगिती उठवावी,स्थगिती उठेपर्यंत पोलिस भरतीला स्थगिती द्यावी या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले.
कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजास शिक्षण व नोकरी मध्ये १२ टक्के आरक्षण मिळाले.यासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत शांततेत आंदोलने केली.कित्येक समाज बांधवांनी बलीदान दिले,तेव्हा कुठे राज्य शासनाने शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु मराठा समाजाला अत्यंत कष्टाने मिळालेले आरक्षण हे राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजु भक्कमपणे न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवू शकले नाही.आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असते तर आज आरक्षणास स्थगिती मिळाली नसती,मराठा समाजाच्या मागण्याकडे राज्य सरकार निष्काळजीपणा करीत आहे.
या आरक्षणाच्या मुद्यास दुर्लक्षित केले.त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.तर दुसरीकडे राज्य सरकारने न्यायालयात Covid मुळे पोलिस भरती करणार नाही असे सांगितले आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरती जाहीर करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. SEBC प्रर्वर्गातील जागाबाबत राज्यशासन काय निर्णय घेणार आहे व यातून कसा मार्ग काढणार आहे हे जाहीर करावे.मराठा आरक्षण स्थगिती उठे पर्यंत पोलीस भरती स्थगीत करावी,कोपर्डी आत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशिची शिक्षा व्हावी या मागणीचा सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.नसता अखिल भारतीय छावा संघटनेला या पेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.यावेळी छावाचे
जिल्हा अध्यक्ष किशोर शिरवत,तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते,जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर एरंडे, जिल्हा सरचिटणीस संजय मोरे,ज्ञानदेव शिरवत,महेश शिंदे,रोहित भोपळे,सागर जोशी,नितीन देशमुख, श्रावण काळे,आप्पासाहेब गिरगे,किरण सातपुते, राहुल कुमावत,अमोल काळे,श्रीराम औताडे,अर्जुन खराद,उमेश ढोले,बंटी धूपे,विजय शिरवत,अभिजित औटे,शुभम काळे,अभिजित उंदरे,दत्ता चिंचखेडे,रामेश्वर डोईफोडे,पंकज फासाटे,गणेश मस्के,सुरज पेरके,तेजेस लाडवाणी,मुकेश औताडे,प्रभाकर जाधव,किरण सदावर्ते,महेश गिरजे,शुभम गायकवाड,परमेश्वर कपटी,लक्ष्मण शिदे,सुनिल मोरे,सुनिल विर,आशिष गोसावी,ज्ञानेश्वर गावंडे,रविंद्र पाचे,वैजनाथ औटे,ज्ञानेश्वर कोल्हे,सुमित पाचोडे,आदी,परमेश्वर क्षीरसागर,एकनाथ मानमोडे,गजानन राजगुडे,महेंद्र वंजारे,भगवानराजे सोलाट,रूषिकेश सगळे,आकाश गवळी,नागेश भडके,महेश मस्के,निलेश गटकळ,सौरभ मोरे,आविनाश डांगे,प्रताप मोरे,अतुल भुरुळे,सचिन आंबेकर,अक्षय शिरवत,अक्षय कासटे,बाबासाहेब पाचे,शांतिनाथ वायकोस,भारत शिरवत यांच्यासह आदी छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close