Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

इनोव्हा कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एकाची उपचारासाठी नेत असताना मृत्यू


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथील घटना


औरंगाबाद-( पैठण ) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील इनोव्हा कार ने दुचाकी स्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात एक जण जागीच ठार तर गंभीर जखमी अवस्थेत असलेला एक जण औरंगाबाद येथे हालवले आस्था त्याची ही मृत्यु रस्त्यात असताना झाल्याची घटना पैठण तालुक्यातील मुरमा फाटा येथे शुक्रवार दि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडले आहे              या घटनेविषयी अधिक माहिती अशी आहे की दुचाकी स्वार मुस्तफ लालखा पठाण वय ४२ वर्ष, बबन निवृत्ती काशी वय ३६ वर्ष दोघे ही डोणगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील रहिवासी असून सकाळी आपल्या घरून पाचोड येथे मिस्तरी काम करण्यासाठी आपल्या दुचाकी क्रमांक Mh २० ए एन २३८२ ने जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुरमा फाटा येथे बीड कडून औरंगाबाद कडे भरधाव वेगात जात असलेली इनोव्हा कार क्रमांक Mh २३ बी बी ००७४ने पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार धडक दिल्यानंतर जवळपास 200 ते 250 फूट रस्त्याच्या कडेला दूर जाऊन पडला तर दुचाकीच्या अक्षरशा चिंधड्या झाल्या ही घटना शुक्रवार दि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेत दुचाकीस्वार मुस्तफा पठाण वय 42 वर्ष हा घटनास्थळीच ठार झाला तर बबन काशी हा गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मुरमा ग्रामस्थ व साई हॉटेल चे मालक उद्धव भाऊ  मगरे, पमचर दुकानदार अमोल गीतखणे, सोमनाथ गीतखणे जुबराईल पटेल आदींना कळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सौदागर, डॉ संदीप काळे, डॉ घुगे आदींनी तपासून मुस्तफा पठाण याला मृत घोषित केले तर जखमी बबन काशीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवले असता रस्त्यातच प्राणजोत मालवली आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून बीट जमादार फिरोज बर्डे पो कॉ शिंदे आधी पुढील तपास करत आहेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close