Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पनवेलमध्ये राजकीय भूकंप



पनवेल : mh20live newtowrk
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मित्र पक्षांना नव्याने उभारी मिळू लागली. या सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची रीघ लागून पक्ष मजबूत होण्याकडे कल गेला. पनवेलमध्ये राष्ट्रवादी पक्षही पुन्हा एकदा नव्याने मुसंडी मारून भक्कम होताना दिसत आहे. येत्या पंधरा दिवसात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य असा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल मधील कळंबोली येथे असणाऱ्या तटकरे महाविद्यालयात रविवारी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पनवेल महापालिका जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
दिवाळीनंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्याने मुसंडी मारत असल्यामुळे आतापर्यंत बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी “राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा” चा नारा देवून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इंकमिंग सुरूच झाली असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भक्कम तर होतच आहे, मात्र येत्या काही दिवसात पनवेलमध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पनवेल महापालिका जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळ्यात पनवेलमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस तथा नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सचिव सूरदास गोवारी, मा.नगरसेवक शिवदास कांबळे, युवक अध्यक्ष प्रमोद बागल, पनवेल महापालिका महिला निरीक्षक भावना घाणेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खा.सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी भव्यदिव्य अशा स्वरूपात होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवून हा सोहळा यशस्वी करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close