Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

देखभाल दुरुस्तीसाठी एक गाव-एक दिवस अभियानास धुप्पा गावातून सुरुवात

वरिष्ठ अधिका-यासह कर्मचा-यांचा समावेश

नायगाव/ शेषेराव कंधारे
महावितरणच्या कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर पावसाळापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे सर्वत्र सुरू असून याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एखाद्या गावात देखभाल दुरुस्ती सर्व कामे एकाच दिवशी पुर्ण व्हावीत या हेतूने नांदेड परिमंडळाच्या वतीने एक गाव-एक दिवस हे विशेष अभियान नायगाव तालुक्यातील धुप्पा येथे दि.१२ जुन रोजी राबविण्यात आले. इतर कोवीड यौद्ध याप्रमाणेच महावितरण कर्मचारीही एखदया यौध्दयाला साजेसे काम करत सर्व प्रकारची काळजी घेत अभियान यशश्वीपणे राबविण्यासाठी कार्यरत आहेत. या अभिमानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री डी.व्ही.पडळकर,नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.संतोष वाहने यांच्या संकल्पनेतून
देगलुर मंडळाचे कार्यकारी अभियंता एस.जि.चटलावाड ,नायगावचे उप कार्यकारी अभियंता महेश गटुरवाड, सहाय्यक अभियंता बी.व्ही.बोधनकर यांच्या निर्देशानुसार नायगाव तालुक्यातील प्रत्येक गावात एक गाव-एक दिवस हे विशेष अभियान राबविण्यास दि.१२जुन रोजी धुप्पा गावापासून सुरवात करण्यात आली आहे.
नायगाव विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गटुरवाड यांच्या सुचनेनुसार नरसी उपविभागातील धुप्पा या गावामधे उपकार्यकारी अभियंता श्री.बी. व्हि.बोधनकर यांनी सकाळी गावामध्ये जावून या विशेष अभियाना अंतर्गत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठीच एक गाव-एक दिवस या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगत देखभाल दुरूस्तीच्या प्रत्यक्ष कामास सुरवात केली. यामध्ये प्रामुख्याने डीपीवरील किटकॅट व केबलची दुरूस्ती, गावातील खराब झालेले पोल बदलणे, लोंबकळणाऱ्या तारा ओढणे, गावात झालेल्या अपघात प्रवण ठिकाणाची दुरूस्ती, शेतातील वाकलेले पोल सरळ करणे अशा कामांचा समावेश होता.
यासाठी नायगाव विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गटुरवाड, नरसी उपविभागातील उपकार्यकारी अभियंता श्री.बी. व्हि.बोधनकर, गुतेदार साई अष्टे, गायकवाड, डि.पी.आळंदीकर,कौठकर,एम.व्ही.टोकलवाड, तेलंग, मोरे यांनी परिश्रम घेत अभियान राबविले.
एक गाव एक दिवस हे अभियान पुढील किमान दोन महिणे सुरू राहणार असून वीजगाहकांनी दुरूस्तीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
त्याचबरोबर आपले थकीत व चालू वीज बिल भरावे असे आवाहन नायगाव विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गटुरवाड यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच माधवराव कंधारे, सामाजिक कार्यकर्ते माधवराव वाघमारे, मारोतराव वडे, अवकाश पाटील, बजरंग पाटील, शिवकांत कंधारे,नागेश जलेवाड, दत्ता बनसोडे, रविंद्र हणमंते,हणमंत हणमंते,प्रदिप गायकवाड, संतोष दरेगावे यासह आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close