Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

पत्नीचे दागिने विकून उभारली कंपनी.. आज आहे शंभर कोटींची उलाढाल… वाचा शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी कथा..

पत्नीचे दागिने विकून उभारली कंपनी.. आज आहे शंभर कोटींची उलाढाल… वाचा शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी कथा..
सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशभरात तीन महिन्यापासून अनेक जण हे घरातच बसून आहेत. या काळात अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. यामुळे कंपनी मालकांना अनेकांना नोकरीतून काढून टाकावे लागले आहे. असे असतानाही काही जण टिकून नोकरी करत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती 2008 मध्ये देखील आली होती. त्यावेळी जागतिक मंदी आली होती.

त्यावेळी देखील अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, त्या काळात देखील काही जणांनी उद्योग सुरू करून नवीन उभारी घेतली होती. चीनच्या वुहान या प्रांतापासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर हा प्रवास जगभर सुरू झाला. अमेरिकेत लाखो जणांचा मृत्यू झाला, अशीच काहीशी परिस्थिती जगभरातील इतर देशांमध्ये पाहायला मिळत आहे.

याचा एक परिणाम झाला की, अनेक जण घरात अडकुन पडले. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेकांना नोकरी गमवावी लागली. आम्ही आपल्याला 2008 मध्ये घडलेल्या एका प्रसंगात बाबत माहिती सांगणार आहोत. या व्यक्तीचे नाव आहे हर्षपाल सिंग.. जाणून घेऊया यांनी आपला व्यवसाय 100 कोटी पर्यंत कसा नेला ते…

2008 मध्ये जागतिक मंदी आली. हर्षपाल यांचा जन्म उत्तराखंडच्या एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी मायक्रोबायोलॉजी व फूड सॅम्पलचे शिक्षण घेतल्यानंतर 1994 मध्ये एका युनिटमध्ये नोकरी सुरू केली. मात्र, चांगली नोकरी सुरू असताना 2006 मध्ये जगभरात मंदी आली. त्यानंतर 2008 मध्ये त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतर काय करावे या विचारातून ते घरीच राहिले.

काही दिवस गेल्यानंतर त्यांना त्यांची पत्नी बिना यांनी स्वतःचे दागिने विकून दोन लाख रुपये गोळा करून दिले. त्यानंतर त्यांनी गुजरातच्या नवसारी येथे फुड प्रोसेसिंगचा छोटा कारखाना उभारला. त्यानंतर त्यांना पत्नीदेखील कामात मदत करू लागली. सुरुवातीला त्यांना डाळिंबाच्या रसापासून दोन किलो पावडर तयार करण्याची ऑर्डर अमेरिकेतून मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी पुढाकार घेत अंबे फुड प्रोसेसिंग नावाची कंपनी सुरू केली. मात्र, त्यांना जागेची अडचण भेडसावत होती. त्यामुळे त्यांनी उत्तराखंडच्या पौडी गडवाल या गावांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. कर्ज काढून त्यांनी दोन कोटी रुपयांच्या मशीन लावल्या. सुरुवातीला त्यांच्या कारखान्यात केवळ सहा लोक होते. आज त्यांच्या कंपनीत 100 कामगार आहेत.

तसेच त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.हर्षपाल यांची कंपनी हर्बल प्रोडक्ट बनवते. तसेच विदेशी बाजारांमध्ये त्यांचे जवळपास 100 उत्पादने विकली जातात. भारतात देखील त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे.

ॲमेझॉन सोबत केला करार

हर्ष यांनी मिळवलेले यश इथवरच थांबत नाही. तर त्यांनी आता अमेझॉन सोबत करार केला आहे. त्यांच्या कंपनीने तयार केलेला आवळा, हळद, आले, तुळशी, कोरफड, काळीमिरी, शंभर उत्पादन जगभरात जातात. हर्षल यांच्या कंपनीची उत्पादने ॲमेझॉन मार्फत विकल्या जातात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close