Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या शाळेच्या लिपिकावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या शाळेच्या लिपिकावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना /प्रतिनिधी


जालना येथील एम सी एन न्युज चे प्रतिनिधी सुयोग खर्डेकर यांच्याकडे दि. 20 ऑक्टोंबर 2020 रोजी अशोक एकनाथ पाचफुले रा. शिवाजी नगर, म्हाडा कॉलनी, जालना. यांनी त्यांच्या मुलाचा आरटीई अंतर्गत नंबर लागलेला असतांनाही श्री. कै. लालचंदजी सकलेचा मेमोरीयल इंग्लीश स्कुल, सकलेचा नगर, जालना या शाळा व्यवस्थापनाकडून सक्तीने फी वसूल करण्यासाठी तगादा लावला असून माझ्या मुलाचे ऑनलाईन शिक्षण बदं करण्यात आले असल्याची लेखी तक्रार दिली. व पाचफुले न्याय देण्याची विनंती केली. त्यानुसार वृत्त एकांगी प्रसिध्द होणार नाही याची दक्षता घेत पत्रकार खर्डेकर हे शाळेची बाजु समजुन घेण्यासाठी दि. 23 ऑक्टोंबर 2020 रोजी श्री. कै. लालचंदजी सकलेचा मेमोरीयल इंग्लीश स्कूल, सकलेचा नगर, जालना या शाळेत प्रत्यक्ष पालकासह गेले होते. तीथे व्यवस्थापनाच्या नियमाप्रमाणे पत्रकार खर्डेकर यांनी त्यांच्या डायरीला नोंद करुन त्यांची ओळख व भेटण्याचे कारण नमुद केले आहे. व शाळेच्या मुख्यध्यापीका यांना भेटून त्यांचा परीचय दिला. व संबंधीत तक्रारीवर काय म्हणने आहे आपली काय प्रतिक्रीया आहे याची विचारणा केली. त्याचवेळी जितेंद्र चौधरी यांनी माझ्यासोबत वाद घालन्यास सुरुवात केली. त्यावेळी मी मुख्यध्यापक यांच्या सोबत चर्चा करीत असतांना आपण बोलू नये, खर्डेकर हे वृत्तसंकलन संदर्भात जबाबदार व्यक्तीसोबत बोलत असून त्यांच्या भुमीका समजुन घ्यायच्या आहेत असे पत्रकार खर्डेकर यांनी जितेंद्र चौधरीस सांगीलते. त्यावर जितेंद्र चौधरी यांनी आरेरावी करीत वृत्तसंकलन करण्याची गरज नाही, तु खरा पत्रकार आहेस काय? असे बोलल्या नंतर खर्डेकर यांनी त्यांना शांतपणे उत्तर देत आपण बोलण्याच्या मनस्थीतीत नाहीत आपण माझ्यासोबत बोलू नका असे सांगीतले. त्यानंतर खर्डेकर बाहेर आला, त्यावेळी जितेंद्र चौधरी हे विद्यार्थ्याचे पालक अशोक पाचफुले यांच्या सोबत वाद घालत होते. हा प्रकार पत्रकार खर्डेकर यांनी त्याच्या मोबाईल वर वृत्त संकलनासाठी कैद करत होते. या सर्व घटना घडत असतांना त्यांचा शाळेचा एक कर्मचारी मोबाईलमधे चित्रीकरण करत होता, तसेच हा सर्व प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही मधे देखील आलेला आहे. त्यानंतर मी शाळेच्या बाहेर जात असतांना जितेंद्र चौधरी याच्यासह इतरांनी वृत्त कुठे प्रसिध्द झाले किंवा बातमी लागली तर जिवे मारण्याची व सामाजीक बदनामी करुन खोटे खंडणीसह इतर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला असून आर्थीक आणि गुंडांच्या मदतीने माझ्यावर कुठेही कधीही, कोणा करवी देखील हल्ला करणे, किंवा अपघात करुन मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. पोलीस, गुंड आणि राजकीय लोक आमच्या सोबत आहे असे बोलुन धमकावले आहे. माझ्या जिवीतास काही धोका निर्माण होणार नाही यासाठी वरील संदर्भान्वे तात्काळ दखल घेत आपल्या नियमाप्रमाणे कारवाई करावी असा अर्ज सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली असता शाळेत लिपिक जितेंद्र चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close