वयाच्या ८० व्या वर्षी आजीबाईंनी केली चारधाम यात्रा पूर्ण! दुर्दम्य इच्छाशक्तीचा अदभूत प्रवास!
होय, अगदी बरोबर वाचत आहात.असे म्हणतात, प्रबळ इच्छा असेल तेथे आपोआप मार्ग मिळत जातो. अशीच भल्याभल्यांना अवघड वाटणारी चारधाम यात्रा सहल वयाच्या तब्बल ८०व्या वर्षी औरंगाबाद येथील आजीबाईंनी स्मिता हॉलिडेज च्या सोबतीने अगदी यशस्वीरीत्या पूर्ण केली. आयुष्यात एकदातरी चारधाम यात्रा घडावी असे प्रत्येक भाविकाला वाटते. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री अश्या चारही पवित्र धामाचे दर्शन घडावे अशी इच्छा पुष्कळांना असते, पण कधी वयाचे बंधन, आर्थिक अडचण,नानाविविध शंका यामुळे हि यात्रा करायचे राहून जाते. पण याला अपवाद ठरलेल्या आहेत औरंगाबाद च्या सौ.कौशल्या पुंडलिकराव बेंबडे.
आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बेंबडे आजीनी हि चारधाम यात्रा काही ठिकाणी घोड्यावर तर काही ठिकाणी अगदी चालत जाऊन पूर्ण केली. या सहलीमध्ये आजीबाईंच्या सून आणि मुलगा हि सहभागी होते. प्रवासाला वयाचे बंधन नसते हे आजीबाईंनी दाखवून दिले. चारही धामाचे व्यवस्थित दर्शन घेऊन आयुष्यातील हा सुंदर प्रवास कौशल्या आजींनी स्मिता हॉलिडेज च्या सोबतीने संपन्न केला. प्रवाश्यांच्या वयाचा विचार करून अगदी
व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आणि उत्तम काळजी घेतल्यामुळे हि यात्रा मी यशस्वीरीत्या पूर्ण करू शकले असे बेंबडे आजी म्हणतात.
तब्बल १६०७ किलोमीटर चा प्रवास असणारी हि खडतर पण तितकीच अदभूत आणि सुंदर यात्रा औरंगाबाद येथील स्मिता हॉलिडेज ने ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित केली होती. सुयोग्य पद्धतीने नियोजित केलेल्या या सहलीला भाविक पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि येथील तब्बल २०० प्रवाश्यांनी हि सहल बुक केली. पुणे ते पुणे विमानप्रवासासह असलेली हि १२ रात्र १३ दिवसाच्या सहल १८ तारखेला पूर्ण झाली. पुणे विमानतळावर सर्व प्रवाश्यांचे जंगी स्वागतहि झाले. अश्या प्रकारे सहलीचे उत्तम आयोजन करून दिल्याबद्दल सर्व भाविक प्रवाश्यांनी स्मिता हॉलिडेज चे टूर गाईड तुषार भामरे आणि ऋषिकेश राठोड यांचे आभार मानले आणि यापुढील सहलीसाठी केवळ स्मिता हॉलिडेज ला प्राधान्य देऊ असे मत व्यक्त केले. या सहलीमध्ये मध्ये सोनवणे, आढाव, देशपांडे, मनसुटे, कदम, पिंगळे, पाचपुते, कटके, बेंबडे, शिंदे या कुटुंबीयांचा सहभाग होता.