Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

सोयगाव तालुक्यात ढगाळ वातावरण…गारठा वाढला..रब्बीच्या पिकांवर प्रादुर्भाव……..



   सोयगाव / प्रतिनिधी
   सोयगावसह तालुक्यात शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण आणि गारठा निर्माण झाला होता,मात्र या दिवसभरच्या ढगाळ वातावरणाने रब्बीच्या पिकांवर प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.वाढत्या ढगाळ वातावरणाने रब्बीसाठी पोषक असलेले वातावरण बिघडल्याने रब्बीच्या पिकांची वाढ खुंटली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
     सोयगाव तालुक्यात अचानक ढगाळ वातावरण आणि गारठा वाढला होता दिबसभर या ढगाळ वातावरणाने सूर्यदर्शन झाले नव्हते त्यामुळे रब्बीची कोवळी पिके संकटात सापडली होती.आधीच खरिपाच्या संकटातून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीवर आशा पल्लवित केल्या असतांना वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे मोठे संकट कोसळले आहे.
———-हरभरा पिकांवर मोठे संकट———–
  सोयगाव तालुकुयात यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड वाढली आहे,परंतु वातावरण पोषक नसल्याने हरभरा आणि गव्हाचे पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
—————भाजीपाला संकटात———–
  सोयगाव तालुक्यात ८१० हेक्टरवर भाजीपाल्याचे क्षेत्र आहे.यामध्ये पालेभाज्यांची सोयगाव तालुक्यात मोठी आवक झालेली असतांना अचानक ढगाळ वातावरणाने पालेभाज्या संकटात सापडल्याचे चित्र आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close