Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कंपनीत चोरी करणारी टोळी गजाआड, दोन गुन्हे उघडकीस एकुण 4,63,573/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त, वाळुज पोलीसांची कारवाई,

वाळुज -येथे फिर्यादी नामे विजय कुमार श्रीपाल जैन यांनी तक्रार दिली की,
फिर्यादी हे दिग्विजय इंडस्ट्रीज येथे लेखा अधिकारी म्हणुन असुन दिनांक 14/10/2020 रोजीचे 21.00 ते दिनांक 15/10/2020 रोजीचे 10.00 वाजे दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खीडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून त्यांच्या कंपनीतून 20 कॉपर वायरचे बंडल चोरून नेले आहे. वैगेरे ‘मजकूराच्या तक्रारीवरून गुरनं 547/2020 कलम 461,380 भादवि प्रमाणे गुन्हा दिनांक 24/10/2020 रोजी दाखल करण्यात आलेले आहे. तसेच फिर्यादी नामे एकनाथ गंगाधर प्रधान य़ांनी फिर्याद दिली की, फिर्यादी हे सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रा.लि. या कंपनीत मॅनेजर असुन त्यांचे कंपनीत दिनांक 05/09/2020 ते दिनांक 17/11/2020 रोजी दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खीडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून 2 कॉपर तारेचे बंडल चोरून नेले आहे. वैगेरे मजकूराच्या तक्रारीवरून गुरनं 617/2020 कलम 461, 380 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.बरील दोन्ही दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक श्री मधुकर सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. श्री. गौतम वाबळे व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी जावुन €€1’४/ फुटेजची पाहणी करुन गुन्ह्यातील गेला मालाचा व आरोपीचा शोध घेतला असता मिळालेल्या गुप्त बातमीवरून ईसम नामे 1) अस्लम बाबू पठाण, वय-30, रा. भारतनगर, वाळूज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद 2) शेख दाऊद शेख हनीफ, वय-23, रा. अजवानगर, वाळूज, ता. गंगापूर, जि.औरंगाबाद यांना दिनांक 22/11/2020 रोजी ताब्यात घेवून विचारपूस करता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून दिनांक 24/11/2020 रोजी त्यांना गुन्ह्यात चोरी केलेले कॉपर तारेचे बन्डल व 7 कॉईल असा एकूण 4,63,573 रू. कि.चा माल व गुन्ह्यात वापरलेली एक युनिकॉर्न मोटार सायकल 50,000 रू. किं.ची अशी जप्त करून दोन्ही गुन्हे उघडकौस आणले आहेत. तसेच त्यांना ज्यांना चोरीचा माल विक्री केला होता त्यांना सुध्दा गुन्हात आरोपी बनविण्यात आलेले आहे. अशा प्रकारे कंपनीमधील चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

‘सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्‍त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त निकेश
खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री
मधुकर सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गौतम वावळे, पोह खय्युमखॉ पठाण, प्रकाश
गायकवाड, सुधीर सोनवणे, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, दिपक कोलमी, हरिकराम वाघ,बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close