Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेटमहाराष्ट्र

जिल्ह्यात 556 जणांनी केली करोनावर मात सध्याची रुग्ण संख्या 405

अलिबाग- रायगड/mh20live Network

दि.29:  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 556 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 52 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-169, पनवेल ग्रामीण-60, उरण-21, खालापूर-6, कर्जत-21, पेण-11, अलिबाग-25, मुरुड-9, माणगाव-32, तळा-6, रोहा-17, सुधागड-1,  श्रीवर्धन-4, म्हसळा-8, महाड-1, पोलादपूर-12  अशी एकूण 405 झाली आहे.

             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-282, पनवेल ग्रामीण 114, उरण-131, खालापूर-2, कर्जत-4, पेण-2, अलिबाग-7, माणगाव-6, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1 अशी एकूण 556 आहे.          

आज दिवसभरातही पनवेल मनपा-9, उरण-1, कर्जत-1, अलिबाग-1, माणगाव-5असे  एकूण  17 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

         आतापर्यंत पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1 असे एकूण 47 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

          आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-25, पनवेल (ग्रा)-3, उरण-1, खालापूर-1,  कर्जत-7, पेण-5, अलिबाग-2, माणगाव-3, म्हसळा-3, महाड-2 अशा प्रकारे एकूण 52 ने वाढ झाली आहे.

           आजच्या दिवसातील पनवेल मनपा क्षेत्रातील 1, पनवेल ग्रामीण-2, उरण-1 अशा एकूण 4 व्यक्तींची मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

         आतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 434 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 360 नागरिकांचे रिपोर्ट  ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 66 आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close