Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

दिल्लीत हॉटेल, मॉल पुन्हा बंद होणार ?


नवी दिल्ली : दिल्लीत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार मॉल, हॉटेल आणि प्रार्थन स्थळे खुली करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करु शकते. महाराष्ट्रात अजूनही मॉल, हॉटेल आणि प्रार्थना स्थळे बंद आहेत. पण दिल्लीमध्ये या गोष्टी सुरु झाल्या आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करावे लागू शकतात. त्या दृष्टीने आम आदमी पार्टीचे सरकार आणि नायब राज्यपाल कार्यालयामध्ये विचारमंथन सुरु आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

काल नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सर्वपक्षीय बैठकीत वेगवेगळया पक्षाच्या प्रतिनिधींकडून मॉल, हॉटेल पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा का? याविषयी मते जाणून घेतली. नायब राज्यपाल कार्यालय आणि मुख्य सचिवांनी यावर कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही. “संख्या वाढली तर त्यादृष्टीने तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही केंद्रावर अवलंबून आहोत. पण आम्ही वेळेनुसार परिस्थितीचा आढावा घेऊ” असे अधिकाऱ्याने सांगितले.

देशव्यापी लॉकडाउनमुळे ७५ दिवस बंद ठेवल्यानंतर दिल्ली सरकारने आठ जूनपासून शॉपिंग मॉल आणि हॉटेल उघडायला परवानगी दिली. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक १.० अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्बंध उठवण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीमध्ये मेट्रो आणि सिनेमा हॉल ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहे.

“आपण देशव्यापी लॉकडाउन सुरु केलं तेव्हा १०० प्रकरणे होती. आता ती हजारांमध्ये आहेत. आपण पुन्हा लॉकडाउन करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. करोना रुग्णांची संख्या वाढू शकते. आपल्याला व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल” असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close