Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ऑटो रिक्षा-टॅक्सी आज रस्त्यावर धावणार

ऑटो रिक्षा-टॅक्सी आज रस्त्यावर धावणार
औरंगाबाद / प्रतिनिधी                                                           लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्यात शुक्रवार(दि.५) पासून ऑटो रिक्षा- टॅक्सीला रस्त्यावर उतरण्याची परवानगी दिली आहे.यामुळे आज शहराच्या विविध भागात ऑटो रिक्षासह टॅक्सीची चाके रस्त्यावर पुन्हा फिरणार आहे. दरम्यान केवळ दोनच प्रवाशांना परवानगी दिल्याने ऑटो रिक्षा चालकांसह प्रवाशांत काही प्रमाणात आजही संभ्रम आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अडीच महिन्यांपासून थांबून असलेल्या रिक्षांची चाके शुक्रवारपासूनगरागरा फिरणार असल्याने विविध भागांत रिक्षांसह प्रवाशांची गर्दी दिसून येणार आहे.दरम्यान सरकारने केवळ दोन प्रवाशांनाचा परवानगी दिल्याने टॅक्सीसह रिक्षाचालकांपुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.अशा स्थितीत प्रवाशांकडून दर आकारणी कशी करावी या बाबत स्थानिक प्रशासनाने काहीच निर्णय न घेतल्याने रिक्षाचालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.या विषयी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्याप काहीच निर्णय झाला नाही.जिल्हाधिकारी कार्यालय बैठक घेऊन मार्गदर्शन केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल,असे सांगण्यात आले.या नियमांचा सर्वात मोठा फटका काळी पिवळीला बसणार आहे.केवळ दोन प्रवाशांवर व्यवसाय कसा करायचा अशी प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड
दरम्यान, आतापर्यंत शेअर रिक्षांनाच प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षातून केवळ दोन प्रवाशांना घेऊन जाााण्याची परवानगी आहे. त्यामुळे  प्रवाशांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे.    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close