Saint Gobain Gyproc
नव्या सुरुवातीसाठी ७ दिवसांत घराचा कायापालट -संत गोबेन जिप्रोक
औरंगाबाद – संत गोबेन जिप्रोक म्हणतात वर्षाखेरीचे दिवस आपल्यासोबत नव्या वर्षाचा सांगावा घेऊन येतात आणि एका नव्या सुरुवातीची आशा मनात जागवतात. आणि इथे तर आपण जवळ-जवळ दोन वर्षे पॅनडेमिकने लादलेल्या बंदिस्त वातावरणात काढली आहेत, त्यामुळे आपल्या साध्यासुध्या घराला कामाच्या नव्या हायब्रिड पद्धतीसाठी अधिक सोयीचे बनवत व त्यात अनेक टिकाऊ बदल घडवून आणत त्याला एक नवे रूप देण्याची गरज अधिकच जाणवू लागली आहे. त्यातच लग्नाचा मोसमही सुरू झाल्यामुळे आपल्या घरांना नव्याने सजविण्यासाठी आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी आणखी एक चांगले निमित्त मिळाले आहे. चार भिंतींच्या जागेला घरपण मिळवून देण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे खरे असले तरीही फर्निचरच्या रचनेपासून ते भिंतींच्या रंगापर्यंत, फरशी निवडण्यापासून छताची सजावट ठरविण्यापर्यंत सर्व गोष्टी नव्या सुरुवातीची नांदी अधिकच रंगतदार बनवितात. पण घराचे नूतनीकरण करण्याची ही सगळी प्रक्रिया कमालीची वेळखाऊ आणि गैरसोयीची असल्यामुळे आपल्यातील बहुतेक जण हे काम हाती घ्यायला टाळाटाळ करताना दिसतात. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे योग्य नियोजन आणि गृहसजावटीच्या सर्जनशील कल्पना यांच्या साथीने वर्षाच्या या सर्वाधिक वाट पाहिल्या जाणा-या काळासाठी तुम्ही तुमच्या घराला अगदी सहज नवे रूप देऊ शकता. फारशा गडबडीशिवाय सहज नूतनीकरण करता येईल असा घरातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे घराचे छत. तेव्हा तुम्ही घरसजावटीच्या या नुस्ख्यांची नोंद करून घेत असाल तर सुरुवात तिथूनच करण्याचा सल्ला आम्ही देऊ:
छत, घराची अत्यावश्यक पाचवी भिंत: घराच्या अंतर्गत भागाची नव्याने सजावट करण्याचा मुद्दा येतो तेव्हा सर्वसाधारणपणे भिंती आणि जमीन यांचाच विचार आधी केला जातो. आपल्या आवडीनुसार या गोष्टी करणे आवश्यक असले तरीही घरातील वातावरणामध्ये शांतता भरण्याच्या कामी छताची भूमिकाही कमी महत्त्वाची नसते. घरांना आगळेवेगळे, उंची आणि दिमाखदार रूप देण्यास मदत करून एक संपूर्ण विस्मयकारक परिणाम साधण्यामध्ये छतांचे योगदान मोठे असते. घराच्या या पाचव्या भिंतीला सौंदर्यपूर्णतेचा स्पर्श लाभावा यासाठी आता अनेकजण डिझायनर कृत्रिम छतांचा पर्याय निवडू लागले आहेत. घराच्या अंतर्गत सजावटीवर याचा लक्षणीय प्रभाव पडतो. सध्या बिल्डर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्यं इतकेच नव्हे तर आर्किटेक्ट्ससुद्धा गृहरचनेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ‘डिझायनर फॉल्स सीलिंग्ज’च्या वापरावर भर देऊ लागले आहेत.
छताच्या सजावटीसाठी मदतनीस: घरमालक म्हणून आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीची नव्याने रचना करताना हे काम खूपच खर्चिक वाटू शकते. पण हे काम पूर्ण करण्यासाठी आजकाल वापरल्या जाणा-या पद्धती पाहिल्या तर या कामासाठी अगदी बँकखाते रिकामे करण्याची नौबत येत नाही हे तुमच्या लक्षात येईल. मात्र त्यासाठी आपल्या नूतनीकरण प्रकल्पामध्ये तुमच्या जोडीला एक विश्वासार्ह साथीदार मात्र असायला हवा. यासाठीच सेंट गोबेन जायप्रॉक (Saint Gobain Gyproc)ने तुमचा मूड, तुमचे बजेट आणि उपलब्ध वेळ यांना साजेसा एक संपूर्ण नवा कॅटलॉग विकसित केला आहे, जो अवघ्या सात दिवसांमध्ये तुमच्या छतांना एक नवे रूप मिळवून देऊ शकतो. जिप्समपासून बनविल्या जाणा-या छताची किंमत ही एका नव्हे तर चार निकषांनुसार ठरते – तुम्ही निवडलेली डिझाइन, छत बसविण्यासाठी येणारा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि कामगारांचा खर्च. सर्व खर्चांचा हिशेब केला तर सर्वसाधारणपणे प्रती चौरसफूट १०० ते १४० रुपये खर्च येईल असे आपण धरून चालू शकतो. अर्थात हे पूर्णपणे तुम्ही कोणत्या प्रकारच्या अंतर्गत सजावटीचा विचार करत आहात यावर अवलंबून असते. जायप्रॉक तुम्हाला तुमच्या राहत्या जागेसाठी जास्तीत-जास्त साजेशी डिझाइन निवडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शनही करते. आणि हे सारे अत्यंत वाजवी आणि परवडण्याजोग्या किंमतीत. परिणामी छताच्या नूतनीकरणासाठी जायप्रॉक हा तुमचा सर्वात विश्वासार्ह मदतनीस ठरू शकतो.
सौंदर्यपूर्णता आणि बरेच काही: जायप्रॉक बोर्डसचा वापर करून छताचे डिझायनिंग करताना निवडीसाठी तुम्हाला असंख्य पर्याय सापडतील. आपल्या राहत्या जागेच्या सजावटीमध्ये नाट्यमयता आणण्यासाठी तुम्ही छताला वेगवेगळे आकार निवडण्याचे प्रयोग करून पाहू शकता. यामुळे तुमच्या घरेच सौंदर्य अधिक खुलून दिसेल आणि त्याला एक आकर्षक सफाईदार रूप मिळेल. डिझायनर छतांना एक सौंदर्यमूल्य तर असतेच, पण त्याचबरोबर त्याचे इतरही असंख्य फायदे असतात. फॉल्स सीलिंग्जच्या वापरामुळे घरातील एअर कंडिशनिंगचा पुरेपूर वापर होतो आणि उन्हाळ्यामध्ये येणा-या भारंभार वीजबिलांमध्ये घट होते. उदाहरणार्थ, तुमची खोली १२ x १२ चौ. फुटांची आहे आणि तुमचे फॉल्स सीलिंग हे ख-या छतापासून एक फूटभर खाली आहे तर तुमच्या घरातील १२ x १२ x १ घन अवकाश कमी होतो, जिथे एसीच्या कूलिंगची गरज भासत नाही आणि त्यामुळे वीजबील कमी होते. त्याशिवाय प्रकाशाचे समान वितरण, कन्सिल्ड वायरिंग आणि पाइप्स, घराच्या थीम/मूडनुसार विशिष्ट पद्धतीने छताची रचना करणे या सर्व गोष्टी फॉल्स सीलिंगच्या मदतीने साधता येतात. या व्यवसायातील एक विख्यात नाव असलेल्या जायप्रॉककडे वॉल डेकोर आणि फॉल्स सीलिंगचे विपुल पर्याय आहेत. ही फॉल्स सीलिंग्ज जिप्समसारख्या हलक्या आणि टिकाऊ पदार्थापासून बनलेली आहेत, जी नियमित वापरानंतरही दोन दशकांपर्यंत टिकू शकतात, बसवायला सोपी असतात आणि वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये मिळतात.
आज आपण एका अशा नव्या जीवनशैलीमध्ये प्रवेश करत आहोत, जिथे आपल्यासाठी अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी राहण्याची गरज सर्वाधिक प्रमाणात भासणार आहे आणि हे साध्य करण्यामध्ये आपल्या भोवतीच्या परिसराची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. घराबाहेर घडणा-या गोष्टी आपल्या फारशा नियंत्रणात नसल्या तरीही आपल्या घराच्या चार भिंती म्हणजे नेहमीच आपल्यासाठी एक सुरक्षित आस-याचे ठिकाण असणार आहे. आपण अनिश्चिततेच्या पर्वामध्ये प्रवेश केल्याला आता जवळ-जवळ तीन वर्षे झाली आहेत, पण तरीही आपले घर अजूनही आपल्यासाठी एका नव्या सुरूवातीचे शुभवर्तमान देणारा स्वागतार्ह बदल घडवून आणण्याचे ठिकाण बनू शकते. घराच्या सजावटीमध्ये केलेल्या योग्य बदलांद्वारे हे साध्य करणे शक्य आहे. तेव्हा हे झटपट बदल घडवून आणा व आपले घर नव्या वर्षासाठी आणि शाश्वत भविष्याच्या स्वागतासाठी सज्ज करा.