Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडले धरणाची पाणीपातळी पोहचली ९५ टक्क्यांवर

किरण काळे / पैठण
जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांवर पोहचली असून धरण तुडुंब भरले आहे.धरणात सध्या वरील भागातून ७५ क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने ९५ टक्के भरले आहे.जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पत्रात १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे अर्धा फुटाने उघडले,दहा हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे सध्या धरणाच्या १० ते २७ या क्रमांकाचे दरवाजे अर्धा फूट उंचीपर्यंत उचलण्यात आलेले आहेत.त्यामधून १० हजार क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.वरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले असुन धरणातून पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्यास जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडु नये यासाठी खबरदारी म्हणून १० हजार क्यूसेकने विसर्ग,जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते उघडले गेट आज दि.२९
सप्टेंबर बुधवार रोजी ११:०० वाजता १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण मुख्य अभियंता विजय घोगरे,अधिक्षक अभियंता संबिरवार,तहसीलदार चंद्रकांत शेळके,जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल,पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार,गटविकास अधिकारी ओम रामावत,न.प.मुख्यधिकारी संतोष आगळे,अश्विन गोजरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अनिता वानखडे,सहायक स्थापत्य अभियंता गंगाधर निसर्गंध आदी उपस्थित होते.
जायकवाडी धरणात सध्या ७५ हजार क्युसेकने आवक सुरू असुन वरील धरणातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आल्यास जायकवाडी धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढु शकतो नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.तसेच आवश्यक साधन सामुग्री , पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातरीत करावे , असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close