Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

शक्ती पंप्सच्या देशांतर्गत व्यापारात १७८% ची वृद्धि

शक्ती पंप्सच्या देशांतर्गत व्यापारात १७८% ची वृद्धि

१७ ऑक्टोबर २०२०, मुंबई/पीथमपुर:- भारतातील ऊर्जा कार्यक्षम (एनर्जी एफिशियंट) पंप्स  आणि सौर ऊर्जा समाधान क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२० रोजी  दुसऱ्या तिमाहीच्या शेवटपर्यंत उत्कृष्ट आर्थिक प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे. प्रथम तिमाहीच्या तुलनेत कंपनी ने देशांतर्गत व्यापारात १७८% वाढ नोंदवली असून आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवट पर्यंत १५३ कोटी रुपये इतका  देशांतर्गत व्यापार केला आहे. हा आकडा या वर्षाच्या प्रथम तिमाहीच्या तुलनेत ९८ कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. कंपनीने या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटपर्यंत ४८ कोटी रुपयांची निर्यात केली असून, मागील तिमाहीत हा आकडा ३६ कोटी रुपये इतका होता.

ग्रामीण, कृषी आणि  निर्यातीत एनर्जी एफिशियंट पंप्स  तसेच  सौर ऊर्जा समाधान क्षेत्रात मागणी वाढल्यामुळे कंपनी निरंतर उत्कृष्ट प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरली. आर्थिक वर्ष

२०२०-२१ च्या प्रथम तिमाही मध्ये कंपनीने ५५ कोटींचा देशांतर्गत व्यापार केला. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निर्यातीमध्ये १२ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

या उत्स्फूर्त परिणामांबद्दल बोलतांना, श्री दिनेश पाटीदार-चेयरमॅन आणि मॅनेजिंग  डायरेक्टर, शक्ति पंप्स  (इंडिया) लिमिटेड म्हणाले की, “शक्ति पंप्स चे व्यवस्थापन तसेच टीमच्या अथांग प्रयत्नांमुळे मागच्या तिमाहीत आम्ही सोलर पंप्स चा निर्माण करण्यात अग्रणी होतो शिवाय कृषी व्यवसाय आणि निर्यातीत देखील वाढ करू शकलो.

आमचे कौशल्य, तंत्रज्ञान, ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची धोरणे, आणि आमची वाढ होईल अशा संधीच्या शोधामुळे आम्ही हे लक्ष्य सहजरित्या पूर्ण करू शकलो. आम्हाला विश्वास आहे की, निर्याती सोबतच, विभिन्न ग्रामीण आणि सौर  (रिन्यूएबल) ऊर्जा योजनेच्या क्षेत्रात आमची मागणी निरंतर वाढेल. आम्ही संशोधन आणि विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे आणि पुढे देखील या विभागात गुंतवणूक करत राहू.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close