धम्माचल अजिंठालेणी येथे १५ वी अखिलभारतीय बौद्ध धम्मपरिषद संपन्न

सागर भुजबळ/ mh20live Network
फर्दापूर डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अण्ड बुध्दिझम आयोजित 15 वी अखील भारतीय बौद्ध धम्म परिषद जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या पायथ्याशी वसलेल्या धम्माचल अजिंठालेणी,फर्दापूर (ता.सोयगाव) येथे दि.30 सोमवार रोजी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी बौध्द उपासक उपासिकांन ची उपस्थिती होती,दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अजिंठालेणी धम्माचल,फर्दापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अण्ड बुध्दिझम च्या माध्यमातून अखिलभारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते दरम्यान दि.30 सोमवारी सकाळी 10:30 वाजता धम्माचल येथे धम्म ध्वजारोहण करून दुपारी 12:30 वाजता भदंत बोधीपालो महाथेरो यांच्या हस्ते 15 व्या बौद्ध धम्मपरिषदेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी भदंत इंदवंश महाथेरो,भदंत प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो,भदंत करुणानंद थेरो,भदंत ज्ञानरक्षित महाथेरो,भदंत धम्मबोधी,भदंत सुदत्तबोधी,भदंत बोधीधम्मा यांनी बौद्ध उपासक उपासिकेंना प्रमुख धम्मदेशना दिली.