यु.पी.येथील रेल्वे अपघातात मृत मजुराच्या अत्यसंस्कारासाठी जवाहरनगर पोलिसांनी व माणुसकी समूहाने पाळला मानवधर्म
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा पुढाकार
औरंगाबाद: सदरील एक व्यक्ती नामे सम्यु हरीलाल राजभट वय ४० वर्षे हा जवाहर नगर औरंगाबाद येथे आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी पेंटिग कामासाठी यु.पी.राज्यातुन मु.पो.सुरवली जील्हा देवरीया यु.पी.येथुन ५ महिन्यापासुन औरंगाबाद शहरात वास्तव्यास होता सदरील इसमाच्या सोबत कोन्हिच नातेवाईक नव्हते तो एकटाच शहरात आपला उदरनिर्वाह भागवीत होता दि ७-३-२२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे रुळानजीच रुळावरुन जानाऱ्या रेल्वे च्या धडकेत जखमी झालेला होता. नागरीकांनी जवाहरनगर पोलिसांना अपघातग्रस्ताची माहिती कळवली असता त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करन्यात आले त्यास अपघात विभाग दाखल केले असता डॉ.तपासुन मृत घोशीत केले.त्याचे कोन्हि नातेवाईक शहरात नसल्याचे पोलिस तपासात समोर आले असता पोलीसांनी मयताची ओळख पटविन्यासाठि शव घाटिच्या शव विच्छेदन गृहात ठेवले व त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याची मोहीम घेतली असता यु.पी.राज्यातुन सुरवली जील्हा देवरीया या गावाचा असल्याचे पोलीस तपासात समजले नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्याची एक वृद्ध आई असल्याचे कळाले व एक अपंग बहीण व त्याच्या कुटुंबात दुसरे कोणीच नसल्याचे समोर आले सदरील मयता ची माहिती दिल्यानंतर दोन दिवसांनी त्याची बहिण एका पायानी अपंग आहे ती ही शहरात दाखल झाली असता आज तिच्या समक्ष ओळख पटवून पी.एम करन्यात आले परीस्थिती हलाकीची असल्याने त्याच्या कडे जेवन्यासाठिहि पैसे नाहीत ते प्रेत अत्यवीधी साठि आपल्या गावी घेवुन जावु शकत नाहि त्यानी सागीतले कि साहेब तुम्हिच मदत करा हि बाब उपपोलीस निरिक्षक वसंतराव शळके याच्या लक्षात आल्यानंतर त्यानी शहरातील बेवारस निराधारांच्या मदतीसाठी काम करनाऱ्या सु-लक्ष्मी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांच्याशी सदरील माहिती फोनद्वारे कळवीली असता आज जवाहरनगर पोलीसांच्या मदतीने माणुसकी समुहाच्या टिम ने अत्यवीधी करन्यासाठि मदतकार्य केले. माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे समाजसेवक सुमित पंडित हे त्याच्या अत्यविधी साठि धावुन आले.व त्याचा मृत ईसमाचा कैलासनगर स्मशानभूमीत अत्यवीधी करन्यात आला.या सामाजिक कार्यात जवाहरनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील,पोलीस उपनिरीक्षक वसंतराव शळके,शेख साहेब,पोलीस हेडकाँस्टेबल यादवराव डफळ,पो.काँ,रमेश काळे,समशेर सिंग सौदी,
यांनी अत्यवीधी साठि आर्थिक मदतहि केली,समाजसेवक सुमित पंडित,चाचु अँबुलंस ग्रुप चे किरन राँवल,माणुसकी समुह टिम आदिनीं अत्यविधी साठि मदतकार्य केले.
दानशुरानी अत्यवीधी च्या मदतीसाठी पुढे यावे
आम्ही कितीतरी गोरगरिबांना अहोरात्र मदत करतो आतापर्यंत खुप बेवारस पेशंट च्या अत्यसंस्कार आमच्या माणुसकी समुहाने केले.त्याच्या कडे गावी परत जान्यासाठि देखील पैसे नव्हते त्या एका पायांनी अपंग आहेत माणुसकी समुहातर्फे समशेर सिंग सौदी,यांनी आर्थिक मदतहि केली. त्याची गावी जान्यासाठि आर्थिक मदतहि करन्यात आली व कपडे देखील घेवुन दिले त्या ताईने आश्रु अनावर झाले त्यानी शेवटि जातांना आपल्या भावना व्यक्त करत म्हटल्या की आपने हमारा यहा पर कोई भी नहि था हम ये सब नाही कर सकते थे आपने भगवान के जेसै आकर हमारी मदत की,या शब्दात व्यक्त केली.
——--समाजसेवक सुमित पंडित