Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे उपस्थितीत बांधावर खत

करमाड/ बडू उकीर्डे ( mh20live Newtowrk)
कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर खते बियाणे खरेदीसाठी बाजारात होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून पाऊस पडायच्या अगोदरच खत बियाणे भरून ठेवले पाहिजे” असे मत करमाड येथील कार्यक्रमात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके यांनी व्यक्त केले. शनिवार दि.०९ मे रोजी करमाड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटप या कृषी विभागाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
करमाड येथे कृषी विभाग व जिल्हा परिषद यांचे संयुक्त विद्यमाने बांधावर खत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, जगन्नाथ काळे यांच्या हस्ते

यावेळी रामेश्वर कृषी सेवा केंद्र, श्रीनाथ अग्रो सर्व्हिसेस, अभिजित ऍग्रो सेंटर,सुयश ऍग्रो सेंटर, ओम ऍग्रो व गौरी कृषी उद्योग येथून सहा शेतकरी गटांनी विविध प्रकारचे ६२ टन खत उचल केली आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, गट विकास अधिकारी राठोड, उप विभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हदगाव कर, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवर, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, माफदा चे अध्यक्ष जगन्नाथ काळे,पंचायत समिती सभापती छायाताई घोगरे, कृषी अधिकारी सुदर्शन मामिडवार, जिल्हा परिषद सदस्य बबन कुंडारे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल कोरडे, भगवान मुळे, कृष्णा उकर्डे, एकनाथ उकर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख जिजा कोरडे, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याणराव उकर्डे, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close