Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

गोठ्यात घुसून वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा

परतूर-परतूर तालुक्यातील वरफळ येथील शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला करून अज्ञात वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी ( दि,२४ ) रोजी सकाळी उघडकीस आली. वरफळ येथील शेतकरी शेख मुखीद शेख मजीद,  यांचा गावा लगतच जनावरांचा गोठा आहे. शेख मुखीद यांनी रविवारी रात्री दिनांक २३ मे रोजी या गोठ्यात ११ शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्या जवळ त्यांचे लहान भाऊ झोपले होते, सकाळी त्यांनी झोपेतून उठल्यावर पाहिले असता गोठ्यात बांधलेल्या ११ पैकी ०९ शेळ्या मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आल्या, व अन्य दोन तडफडू लागल्या नंतर काही वेळाने त्यांनीही प्राण सोडले,  गोठ्यातील दृष्य पाहून शेतकऱ्यास धक्काच बसला. गोठ्यातील ११ शेळ्यांचा अज्ञात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांनी आरडा-ओरडा केली, तेंव्हा शेजारील लोक धावत आले. गोठ्यातील जाळी तोडून शेळ्यांवर हल्ला झाला असावा असा अंदाज  व्यक्त केला जात आहे.  या हल्ल्यात शेतकऱ्याचे जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेची माहिती पशु वैधकीय अधिकारी, पोलीस ठाणे, व वनविभागाला याची माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस  कां. डी.जे.शिंदे व महसूल विभागाच्या वतीने तलाठी अरुण कुलकर्णी,पशू वैद्यकीय अधिकारी श्री सावन, व वनविभागाच्या वतीने वनपाल एल.बी.घुगे, वनरक्षक युवराज शिंदे,वनसेवक शेख इसाक यांनी भेट देऊन पंचनामा केला  वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close