Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

आज कोरणामुळे पाच जणाचा मृत्यू ,घाटीतून 11जण कोरोनामुक्त झाले

औरंगाबाद/mh20live

दिनांक  25 (जिमाका) :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.  
कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी  रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय  महिला रुग्णाचा सकाळी  6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू  असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close