Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

करोना महामारी से हैरान दुनिया सारी लेखिका कवयित्री सुरेखा रावणगावकर

करोना महामारी से हैरान दुनिया सारी
लेखिका कवयित्री सामाजिक कार्यकर्ता
सुरेखा सुरेश रावणगावकर
सध्या करोना ह्या संसर्गजन्य रोगाने जगभर मानवाला त्रासुन सोडले आहे. आपल्या कुटुंबावर वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून घरात बसने शासनाला व पुलीस बांधवांना सहकार्य करने .कोविड 19 ह्या विकारामुळे जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. चीन मधील वुहान ह्या शहरात हा व्हायरस प्रथम आढळला. दुनियेच्या ऐकंदरीत बर चालल होत पन अचानक बटन दाबल्यानंतर किंवा ब्रेक दाबला कि गाडी कशी थांबते तशी शहर थांबली. रस्ते सुनसान झाले माॅल होटेल विरान झाले जिवनमृत्यू हा खेळ ऊन सावली सारखा झाला.सगळ जग एका अंधाराच्या खाईत ढकलले असे झाले सकाळी फक्त चिमन्यांचा चिवचिवाट पक्षांचे आवाज वारा सु सु करत घुमत होता गाड्यांचे हॉर्न नाही धुराचे लोट नाही प्रदुषण नाही सगळ अगदी स्वप्न पडल्या गत झाले पन …
पन ऊद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत मजुरी करून पोट भरणार्यांचे बेहाल होत आहेत. काम नाही तर दाम नाही, मग पोट कसे भरनार .आपली खेडी सोडुन आलेली हि लोक दहा पंधरा वर्षे शहरात राहात होती आता काम नाही म्हणून निघाली गावेकडे पायी प्रवास. रस्त्याने रात्रंदिवस प्रवास ऊन नाही, न वारा नाही छोटी मुल सामान सोबत कुनी कुठे आहे तर कुनी नाही. ह्या महामारीने जिवन जगने मुष्कील केले आहे. गावाकडे सुध्दा काही ठिकाणी लोकं गावातल्या लोकांनाच गावबंदी करत आहेत मग ह्या लोकांनी कुठ जायचं.सगळी नाती असुन नसल्यागत झालेली आहेत.प्रत्येकजन संशयाच्या नजरेने समोरच्या व्यक्तिस पहात आहे विचित्रच झाले आहे एखाद्या चित्रपटाचा भाग असावा अशी अवस्था झाली आहे.
खुप लोक आजारी आहेत कुनाला रक्तदाब कुनाला शुगर कुनाला काही तर कुनाला काही पन दवाखाने काही बंद स्वरूपात असल्यामुळे विलाज चालू आहे. ह्यां करोना आजारा दरम्यान काही नवीन ईंग्रजी शद्ब आपल्या ऐकण्यात आले ते म्हणजे क्वारंटाईन, आयसोलेशन पॅनडेमिक, ईंक्यबेशन पिरीयड हे शब्द वारंवार ऐकण्यात येतं आहेत. क्वारंटाईन म्हणजे विलगीकरन हा शब्द वेगळा च वाटत आहे हा शब्द करोना सोबत च आला आहे .विलगीकरन ह्यांचा अर्थ वेगळे ठेवणे इतरांपासून काही दिवस डाॅक्टरांच्या म्हणण्या नुसार त्या व्यक्तीला ठेवने समाजात पसरू नये म्हणून काळजी घेतली जाते.
आयसोलेशन व क्वारंटाईन हे दोन वेगळे शब्द आहेत आयसोलेशन ला अलगीकरन मनता येईल
प्रत्येकजन एकमेकांना काळजी घ्या हे आत्मयीतेने सांगत आहेत 35 दिवसानंतर सुध्दा हा विषारी संसर्ग काबुत येत नाही. सगळे जीवनमान बदलले आहे दिवसभराचे कामाचे शॆड्युल असायचे सर्व बंद पडले आहे जिवन रंगहिन वाटत आहे.
मुलांची अभ्यासाची सवय तुटली आहे त्यामुळे भविष्यात पुन्हा खुप संघर्ष करावा लागेल.सकाळी लवकर उठून काम करणारी व्यक्ती दुपारी बारा वाजता झोपेतुन उठत आहे .
नियोजन नाही आयोजन नाही त्यामुळे कसलीच भिती राहिली नाही. प्रत्येकाला वाटत आहे आपल काही बर वाईट होनार तर घ्या खाऊन ऐक महिन्याच राशन पंधरा दिवसात संपवत आहेत पहिले पन खात होते पन आता दिवसभर कामच काय हे कर ते कर खा आणी टि वी समोर बसा कुठे किती संख्या वाढली कुठे किती गेले कुठे किती कमी झाले दुसर काहीच सुचत नाही. करोना व लाॅकडाऊन मुळे देशाच्या व्यवसायात प्रचंड हानी झाली आहे बळीराजाची अवस्था खुप वाईट झाली कृषीप्रधान देशात शेतकर्याचा प्रत्येक ऋतुत नुकसान च सहन करावे लागत आहे खरिपाचा शेतमाल लवकरच काढून रब्बीच्या ऋतु तील पिक काढण्यासाठी जागा मोकळी केली जाते कमीत कमी वेळ त तयार होनारे पिक जी रोजच्या रोज काढली जाते जसे की टोमॅटो कांदे टरबूज कोथिंबीर काकडी आंबे ह्या सारखे पिक त्यामुळे रोजच्या रोज विकुन आपल घर चालवतात पन ह्या लाॅकडाऊन मुळे विक्री करणे शहरात पाठवने कठीन झाले आहे पीक कमी विकल जाते व बाकीच सडल जात आहे घाम गाळून कमवलेल व असा घातलेला पैसा पन निघत नाही धाय कोलमडुन शेतकरी पडला आहे अवकाळी पाऊस नको तेव्हा हजेरी लावत आहे गहू खराब होतो कि काय ही चिंता शेतकर्याला लागली आहे लाॅकडाऊन चे चटके बळीराजाला सहन करावे लागत आहेत. आमच्या बालपनी स्कायलॅब नावाच यानं सोडलं होत अमेरिकेने आणि ते पृथ्वीवर पडनार व सर्व जग नष्ट होनार म्हणून असच लोक परेशान झाले होते गोड धोड विविध प्रकारचे पक्वान्न करून खात होते.
अमेरिकेची प्रयोग शाळा
जसा आग्नीचा लावला गोळा
कुनी म्हनतेय काहीतरी करा
कुनी म्हनतेय खाऊन मरा
अशी उडाली ग गडबड
कोनी ढसा ढसा रड
खुप वेगळे दिवस होते ते
ते पन राहिले नाही ते गेले तसे हे हि दिवस जातील
मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास क्रम चालू आहे मुलांनी घरीच अभ्यास करावा सवय तुटू नये ह्या साठी पन ज्या लोकांना राहायला घर नाही खायला अन्न नाही ते लोक मोबाईलमधे पैसे कुठून टाकनार व कसा त्यांची मुल अभ्यास करनार शहरांत शिकणारी कामगारांची लेकर गावी परतत आहेत खुप हाल होत आहेत त्यांचे पाय चालून चालून पायाला भेगा पडल्या आहेत रक्त बंबाळ पाय अनवानी पायी चालत आहेत रात्री कुठेतरी विसावा शोधत रेल्वे च्या पटरीवरच आपल थकलं भागले शरिर टाकत आहेत व ते तिथेच हमेशाच साठी झोपी गेले आहेत तर कुनी घरात खायला नाही मी मुलाला काय खाऊ घालू या विचाराने आत्महत्या करत आहेत चुक कोणाचीही असो पन जगण्याची आस उरी घेऊन निघालेली हि अशी जीव आता पुन्हा कधीच ऊठनार नाहीत.
एक मात्र झाल ज्यांची लग्न जमली होती त्यांनी दहा बारा पाहूणे घेऊन लग्न लावले व पैशाची बचत झाली मुलीला व मुलाला जीवनात तोच पैसा उपयोगी पडेल जो लग्नात रोशनाई मंडप जेवन बारत ह्या वर अनठायी खर्च केला जात होता तो बंद झाला ते तेवढे बरे घडले फटाके प्रदुषण कमी झाले
आर्थिक संकट खुपच आले आहे कधी गावाकडे न येनारी कुटूंब गावाकडे परतली आहेत दिवसभर आपल्या मानसात राहायला मीळाले लाॅकडाऊन मुळे मानसे मानुसकी जपताना दिसत आहेत .
देव कुनी पाहिला नाही पन डाॅक्टरच्या च्या रूपाने देव भेटला अस वाटत आहे
लाॅकडाऊन च्या काळामध्ये आपल्या ला काही खबरदारी घ्यावी लागणार आहे . सार्वजनिक शौचालय वापरू नका बाहेरून आल्या नंतर चप्पला बुटके बाहेरच सोडा. नोटा कागद पत्रे हाताळतांना थुंकी लावने नोटांना हात साबनाने धुवा दुरून बोला स्वताचाच मोबाईल वापरा घरातील लहान मुले व जेष्ठ नागरिक यांची काळजी घ्या आपनच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही भावना कायम ठेवा. होईल तितकी मदत करा गोर गरीबाला अन्न वस्त्र निवारा द्या करोना हा लवकर कमी होनारे रोग नाही हे लक्षात घ्यावे गावाकडे आलेली शहरी मंडळी काही तरी कामधंदा करावा लाॅकडाऊन कमी झाले की लगेच बाहेर फिरायला जाऊ नका गेलात तरी तोंडावर मास्क लावा बाहेरून घरी आल्या नंतर हात पाय स्वच्छ साबनाने धुवायचे हे लक्षात घ्या.
नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ता महिला कार्यकर्ता पुलीस प्रशासन व मानसातला देव डाॅक्टर ह्यांना कोटी कोटी प्रणाम
लवकर ह्या महामारी तुन आपली सर्वाची सुटका व्हावी व पहिल्या सारखं जग हासत खेळत दिसाव
हिच सदिच्छा
लेखिका सामाजिक कार्यकर्ता
सुरेखा सुरेश रावणगावकर
नांदेड

टिप..सबधीत लेखाची सर्व जबाबदारी ही लेखकांची आहे mh20live आसणार नाही, वाचकान साठी

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close