Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

शालेय शिक्षण विभाग महत्वाचे निर्णय

शालेय शिक्षण विभाग महत्वाचे निर्णय

·    शालेय पोषण आहार प्री पॅकस्वरूपात वितरीत

·         केंद्र शासनाने दिलेल्या निर्दशानुसार कोवीड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर विद्यार्थ्यांना पौष्टीक आहारमिळण्याच्यादृष्टीने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ तसेच हरभरा वमृगडाळ (प्री-पॅक) स्वरुपात पुरवठा करण्यात आला.

·         १० वी १२ वी चे निकालाचे काम वेळेत पूर्ण

·         राज्यातील कोवीड-19विषाणूमुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती विचारात घेऊन इयत्ता 10 वी व इयत्ता 12वी परिक्षेच्या उत्तर पत्रिका परिक्षण व नियमन करण्यासाठी परिक्षक व नियमकांना घरी देण्याचा निर्णयघेण्यात आला. तसेच उत्तरपत्रिकांचे संकलन करण्यासाठी जिल्हा व तालूका निहाय संकलन केंद्रे निश्चित करुनया केंद्रावर समक्ष जाऊन उत्तरपत्रिकांचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे कोविड-19 विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीमध्येही इयत्ता 10 व 12वी च्या परिक्षेच्या निकालाचे काम वेळेत पूर्ण करण्यातआले.

·         ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उपाययोजना

·         कोवीड -19 विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सन 2020-2021 साठीचा 11वी ऑनलाईन प्रवेश. प्रक्रीयेसाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

·         अर्ज भरण्यापासून ते प्रवेश निश्चित करेपर्यंत सर्व कार्यवाही संपर्क विरहीत व ऑनलाईन पध्दतीनेकरण्यात येत आहे. यासाठी Moaf Demo Registration ही नविन संकल्पना राबविण्यातआली.माहिती पुस्तिका डिजीटल स्वरुपात उपलब्ध केली तसेच सुलभतेसाठी मोबाईल ॲपतयारकरण्यातआले.

·         विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

·         मराठी भाषा सक्तीची

·         महाराष्ट्र राज्यातील सर्व परिक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगीव्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे इयत्ता 10वी पर्यंत अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले.

·         लर्निंग फ्रॉम होम

·         कोविड-19 च्या प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरुराहण्यासाठी लर्निग फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यात आली.

·         अधिनियमात सुधारणा

·         खाजगी विना अनुदानित शाळेतील शिक्षकांची अंशत: अनुदानित किंवा अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदलीकरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम 1977 मध्येसुधारणा करण्यात आली.

·         फी वाढ न करण्याच्या सूचना

·         कोविड-19 या विषाणुमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणतीही फी वाढ करुनये अशा सुचना राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आल्या.

·         परीक्षा न घेता वर्गोन्नती

·         इ. 9 वी. व 11 वी. च्या द्वितीय सत्राच्या परीक्षा न घेता प्रथम सत्र परिक्षेमधील तसेच चाचण्या, प्रात्याक्षिके वअंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांचा विचार करुन त्याआधारे विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी, असे आयुक्त  (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात आले.

·         ९ वी व ११ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

·         राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन इयत्ता ९ व इयत्ता११ वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्येसुरु होणाऱ्या १० वी व १२ च्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

·         संपर्क साहित्य तयार करण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा

·         राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या संदर्भात संपर्क साहित्य तयार करणे या विषयाबाबत शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

·         बीएमसीशाळां मधील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना

·         बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांनाउपलब्ध करून देणेबाबत निर्णय घेण्यात आला.

·         ऑनलाईन शिक्षणासाठी मार्गदर्शक सुचना

·         पूर्वप्राथमिक ते इयत्ता 12 वी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यानुसार इ. 9 वी. ते 12 वी.च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी 45 मिनिटांच्या चार सत्रांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यात येते.

·         राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना

·         माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व शाळांमधील मुलांना समान आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारती/ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.

·         300 शाळांना आदर्श शाळाम्हणून विकसित करण्याचा निर्णय

·         केंद्र शासनातर्फे देण्यात येणारे PGI (performance Grading Index) पिजीआय मध्ये महाराष्ट्र राज्य श्रेणी ४ मधून श्रेणी १ मध्ये समावेश.

·         पाच हजारापेक्षा जास्त शिक्षकांची  ‘पवित्र’ प्रणली मार्फत भरती.

·         प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के  व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या  २४१७ शाळांना १ नोव्हेंबर २०२० पासून अतिरिक्त २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय.

·         प्रायोगिकतत्वावर द्विभाषिक व एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप

·         शाळेतील मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी ‘वॉटर बेल’ वाचविण्याचा निर्णय

·         लोकशाहीची मुल्ये शालेय जीवनातच रूजविण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय. शाळांमधून संविधान उद्देशिकेचे वाचन

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close