Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शहीद संग्राम पाटील अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


शासनाकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर गेल्या सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांनाही काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले.

या दोन वीर पुत्रांना गमावण्याची वेळ कोल्हापूर जिल्ह्यावर ओढावली. करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले. शोकाकुल वातावरणात शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावरआज (सोमवारी) त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वात आधी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते वीर जवान संग्राम पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्य सरकार दोन्ही वीरमरण आलेल्यांना प्रत्येकी एक कोटी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. वीर जवान अमर रहे…च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात होत्या. संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close