Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वीज बिला बाबत मनसेचे मुख्य अभियंताना निवेदन ; वीजबिल जुन्या दराप्रमाणे देण्याची मागणी

ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद | दि. ३ mh20live Network

लॉकडाऊन च्या काळामध्ये गेल्या तीन महिन्यापासून सर्वसामान्याची कामे ठप्प झाली होती. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने सर्व व्यवहार बंद झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच महावितरण ने वाढीव वीजबिल देऊन आर्थिक संकटात टाकले असून हे वाढीव वीजबिल जुन्या दराप्रमाणे देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणचे मुख्य अभियंता यांना देण्यात आले.

यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मनविसे चे जिल्हा अध्यक्ष राजीव जावळीकर, मनविसे चे शहराध्यक्ष मंगेश साळवे, पुर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील, कार्तिक फरकडे, प्रतिक गायकवाड, नितीन महाजन पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार, यांची उपस्थिती होती.


मनसेच्या वतीने देण्यात आलेलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सरकारने सर्व प्रकारच्या बिलामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे लॉक डाऊन च्या काळात करण्यात आलेली हि दर वाढ तातडीने रद्द करण्यात यावी, प्रत्येक नागरिकास वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी, वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात यावी, वीज बिल जुन्या दराप्रमाणे देण्यात यावेत, तसेच स्थिर आकार, विलंब आकार, समायोजन, वीज शुल्क, व्याज सर्व माफ करून जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close