Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

लंडन मधील मायमराठी चॅनल वर आषाढी एकादशी निमित्त प्रसिध्द गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांचे गायन…

www.mh20live.com


औरंगाबाद । आषाढी एकादशीच्या पावन दिवशी विठूमाऊलीच्या भक्तीरसात
भारतातच नव्हे तर परदेशातही भक्तरसिक तल्लीन होत असतात. दरवर्षी स्वरराज चा आषाढी महोत्सव एमजीएम स्टेडीयम येथे हजारो रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न होत असतो..पण यावर्षी कोरोना मुळे ऑनलाईन कार्यक्रम सादर होणार आहे. यानिमित्ताने युरोप मधील लंडन वारकरी ट्रस्ट ने देश विदेशात सन्मानित प्रख्यात गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांना गायनासाठी निमंत्रित केले आहे व लंडन च्या मायमराठी चॅनल वर ते प्रसारित होणार आहे . आषाढी एकादशी निमित्त लंडन वारकरी ट्रस्ट च्या वतिने भव्य आयोजन करण्यात आले आहे. प्रमोद सरकटे यांनी संगीत बध्द केलेल्या “विठ्ठल परब्रह्म सावळे”अल्बम मधील काही भक्ती गीतेपण या कार्यक्रमात सादर होणार आहेत.लंडन मध्ये मोठ्या संख्येने स्थायिक भारतिय या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत. यानिमित्ताने सातासमुद्रापार विठूमाऊलीचा नामघोष दुमदुमणार आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close