परळी /समीर इनामदार
परळी शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जिरेवाडी या गावी 23 रोजी रात्रीच्या सुमारास बहीण भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे.याबदल सविस्तर वृत्त असे की सटवा ग्यानबा मुंडे जिरेवाडी वय 68 व बहिण शुभ्रा ग्यानबा मुंडे वय 70 यांची आज 24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास काही नागरिकांनी त्यांचा शोध घेतला असता जिरेवाडी येथील शेतामध्ये बहिण-भावाचा मृत्यू दगडाने ठेचलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती यावेळी ग्रा.पो.स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला होता हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्यामुळे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत…