Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

राज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे

पोटाला बॉम्ब लावून इतरांना उडवून टाकू पण आरक्षण घेवू – नरेंद्र पाटील

बीड – राज्य सरकारच्या मनातच पाप आहे. तीन पक्षाच्या सरकारने समाजाचा घात केला आहे, मात्र याद राखा हा शिवरायांचा मावळा असून तो हक्क मिळेपर्यंत शांत बसणार नाही. राज्य सरकारने दि.5 जुलै पर्यंत मागण्या मान्य न केल्यास दि.7 जुलै पासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा ईशारा आ.विनायक मेटे यांनी दिला आहे. तर आरक्षणाचा हक्क हिसकावून सरकारने मराठा समाजाला असेही मारलेच आहे, आता आम्हांला करोनाची भिती काय घालता असा प्रश्न उपस्थित करत पोटाला बॉम्ब लावून इतरांना उडवून टाकू पण आरक्षण घेवू असा निर्वाणीचा ईशारा नरेंद्र पाटील यांनी शनिवारी दिला.

बीड येथे शनिवार दि.5 जून रोजी मराठा क्रांती आरक्षण मोर्चाला संबोधित करतांना आ. विनायक मेटे म्हणाले, मोर्चा होऊ नये यासाठी सरकारचा स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव होता. मात्र प्रशासनाने सहकार्य केले त्याबद्दल आभार. काहींनी त्यात तेल ओतण्याचे काम केले मात्र आज येथे उपस्थित समाज बांधव हे काही श्रीमंत किंवा मोठं मोठे जमीनदार नसून गोरगरीब आहेत. आपला हक्क मिळवण्यासाठी ते आलेले आहेत. करोना असतांनाही समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होऊन महिना झाला तरी राज्य सरकारने पुनर्विचार केला नाही. केंद्र सरकारने मात्र लगेचच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. यावरूनच राज्य सरकारच्या मनात पाप असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने मराठा समाजाचा घात केला असून अशोक चव्हाण यांच्यामुळेच समाजाचे वाटोळे झाले असून उद्धव ठाकरेंनी आधी त्यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी अशी मागणी मेटे यांनी केले. उद्धव ठाकरे बघा , समाज रस्त्यावर उतरला आहे. वेळीच सावध व्हा नाहीतर हे वादळ मुंबईत येऊन धडकेल असा इशाराही मेटे यांनी दिला. बीड तो सिर्फ झंकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असेही मेटे यांनी सांगितले. दुसरा मोर्चा औरंगाबाद येथे काढण्यात येणार असून आमच्या मागण्या 5 जुलै पर्यंत मान्य न केल्यास पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असेही मेटे यांनी ठणकावून सांगितले. तर नरेंद्र पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा खून केला आहे. घरातल्या राजकारणात त्यांनी समाजाचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. विरोध असतो तिथेच मराठा पेटून उठतो. त्यामुळे ज्यांनी विरोध केला त्यांचे आभार पाटील यांनी मानले.मराठा समाज परवानगी घेवून आंदोलने करत नसून आता राज्यभर बोलके मोर्चे काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढतच राहणार असून पोटाला बॉम्ब लावून इतरांना उडवून टाकू पण आरक्षण घेवू असा इशाराही पाटील यांनी दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close