Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

युवकांनी संतांचे विचार आत्मसात करावे :कैलास गायकवाड


औरंगाबाद /mh20live network

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ” संताजी चौक ” एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष कैलास गायकवाड हे होते तर प्रमुख उपस्थिती दामू अण्णा शिंदे,भाऊसाहेब जगताप,विजय गवळी,किसन ठुबे,पप्पू ठुबे, राधाकिसन सिदलंबे होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरडकर( जय संताजी युवा मंच संस्थापक अध्यक्ष ) यांनी केले .

पुढे बोलतांना गायकवाड म्हणाले कि, संतांनी आपले कार्य चारशे वर्ष पूर्वे सुरु केले. आजच्या युवकांनी संतांचे विचार आत्मसात केले पाहिजे.तुकाराम महाराजाच्या सोबत राहून संताजी महाराजांनी प्रभोधनातून  समाजसुधारणेच्या कार्याला गती दिली. गाथा पुन्हा लिहून चारशे वर्ष पूर्वी शिक्षणाचे महत्व पटून दिले. असे प्रतिपादन कैलास गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सोमनाथ सुरडकर,रवी लुटे,श्याम क्षीरसागर,चांगदेव हिंगे,रामेश्वर क्षीरसागर,बद्रीनाथ ठोंबरे, विक्रम ठाकरे,सुरेश वाडेकर,प्रवीण वाघलव्हाळे, जगदीश नांदरकर,ईश्वर पेंढारे,नवनाथ लांडे,निलेश सुरसे,दत्त भोलाणे,सदाशिव ठाकरे,अशोक सोनावणे,प्रकाश सानप,संजय पंडित, अक्षय लुटे, बाबासाहेब दाभाडे,संजय सिदलंबे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close