Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मानवत बसस्थानकातील दूसरे द्वार बंद प्रवाशाना करावी लागते तारेवरची कसरत,रापमंच्या आगार प्रमूखाचे दूर्लक्ष.

मानवत / अनिल चव्हाण

मानवत तालूक्याची निर्मिती झाल्यापासून आज पर्यंत मानवत बस स्थानकाकडे रापमचे कायमच दूर्लक्ष राहिल्याने बस स्थानक असून नसल्या सारखे झाले आहे,
प्रवाशाना कोणत्याही सूविधा बसस्थानकात नाही तर प्रवेश द्वारे सुध्दा अडगळीत पडले आहे, गेल्या महिण्यापासून दूसर्‍या प्रवेश द्बारा पूढे भलामोठा खड्डा खोदल्यामूळे शालेय विद्यार्थ्यासह प्रवाशाना तारेवरची कसरत रण्याची पाळी आली आहे, मात्र प्रवाशांच्या सेवेकडे दूर्लक्ष होत असल्याने प्रवाशामधून संताप व्यक्त केला जात आहे.

मानवत बसस्थानकाची निर्मीती ग्रामिण भागासह लांब पल्याच्या गाड्यासाठी करण्यात आली असून मानवत शहर राष्ट्रीय महा मार्गावर वसलेले शहर आहे तर चौपन्न गावाचा संपर्क असलेल्या या शहरात बसस्थानकाची निर्मीती करण्यात आली, पण आज पर्यंत दूर्लक्ष झाल्याने बस स्थान कात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेश द्बार असल्याने प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता प्रवाशातून व्यक्त केल्या जात आहे. शहरातून शेकडो वाहने बसस्थानका पूढून ये जा करतात बस स्थानकातील एका प्रवेश द्बारामध्ये मोठा खड्डा खोदण्यात आल्यामूळे प्रवाशांची गैर सोय होत असून प्रवाशांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे. गेल्या अनेक दिवसा पासून आगार प्रमूखाच्या आदेशावरून पाडण्यात आलेल्या खड्याचे बांधकाम रखडल्यामूळे , खड्यात पडून अपघात होण्याचे संकेत प्रवाशामधून व्यक्त केल्या जात आहे.
प्रवाशांच्या समस्येकडे दूर्लक्ष होत असल्या मूळे प्रवाशी संघटना व प्रवाशी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे.
रापमच्या गलथान कारभारामूळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close