Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल-शरद पवार

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं, असं शरद पवार म्हणाले.

अन्य राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close