भोकर /प्रतिनिधी
भोकर पासून जवळच असलेल्या सोमठाणा फाट्याजवळ मॅजिक गाडी आणि टेम्पोची जोरात धडक लागून भीषण अपघात झाला या दुर्दैवी अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील साखरा येथील नववधू पूजा पामनवाड सह पाच जण ठार जण ठार झाले तर इतर ५ते६जन गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार 21 फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. अधिक वृत्त असे की धर्माबाद तालुक्यातील येथील नवरदेव नागेश साहेबराव तमलवाड यांचा दिनांक 19 रोजी सकाळी साखरा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे वधूच्या माहेरी थाटामाटात विवाह सोहळा झाला त्यानंतर सायंकाळी वधू आणि वराकडील मंडळी आरतनी परतनी करण्यासाठी जारिकोटला वराच्या गावी सासरी मुक्काम करून परत वधू-वर दि.२१फेब्रुवारी मॅजिक गाडी क्रमांक एम एच 29 ए.आर.3214 ने नवरदेव नवरी इतर नातेवाईक उमरी -भोकर मार्गे साखरा येथे जात असताना भोकर पासून जवळच असलेल्या सोमठाणा फाट्यासमोर टेम्पो क्र.एम.एच ०४-९९५५ ची समोरासमोर जोराची धडक झाली या धडकेत नववधू पूजा तमलवाड(कनेवाड) सह एकूण पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे भीषण अपघातात सहा जण जखमी गंभीर जखमी झाल्याची वार्ता असून संध्याकाळी मिळेल त्या वाहनाने जखमी आणि मृत्यु पावले ल्यांना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले हा भीषण अपघात एवढा गंभीर होता की अलीकडच्या काळात कधीच झाला नव्हता नववधू चे भावी स्वप्न या दुर्दैवी अपघातामुळे भंगले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात जखमींना भोकरच्या रुग्णालयात आल्यानंतर बघ्यांची एकच तुफान गर्दी जमली होती बचावासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यानी शर्तीचे प्रयत्न केले रात्री उशिरापर्यंत कसलाही गुन्हा दाखल झाला नव्हता सर्वत्र नातेवाईकांची एकच हांबरडा फोडला सर्वत्र हाहांकार होता दवाखान्यात जवाबदार डॉक्टर दिसून आले नाहीत ग्रामीण रूग्णालय हे नावालाच दिसत आहे.