Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्रराजकीय

फडणवीसांची आकडेवारी खोटी थोरात,परब,जयंत पाटलांनी केली पोलखोल

mh20live Network

मुंबई :विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कोरोनासाठी केंद्रसरकार करत असलेल्या मदत कार्याचा पाढा वाचला मात्र त्यांची आकडेवारी पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे आज महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.काँग्रेस तर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, व शिवसेनेच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब  यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.कोरोनाच्या संकटकाळात विरोधीपक्षनेते म्हणून आम्हाला फडणवीस यांचेकडून सहकार्य आणि संवादाची अपेक्षा होती.त्यांनी उणीवा दाखवल्या असत्या,सूचना केल्या असत्या किंवा टीका केली असती तर चालले असते.पण असे न करता ते केंद्र आणि राज्याने केलेल्या खर्च आणि तरतुदीची आकडेवारी सांगत आहेत.ती खरी सांगितली असती तर हरकत नव्हती.पण मागील वर्षभराचे,पुढील वर्षाचे मदतीचे आकडे कशासाठी सांगता.खोटी माहिती का पसरवता.आकडे फुगवून का सांगता.सरकारला बदनाम का करता.खरे बोला म्हणजे जनतेला सत्य कळेल.हे ही सांगा की तुम्ही मुख्यमंत्री निधी ऐवजी पंतप्रधान निधीला मदत का पाठवली ? हे ही सांगा की भाजपचे नेते प्रवक्ते आजी माजी मंत्री सध्या कोठे दडून बसले आहेत.सगळे समोर या आणि सत्याची शहानिशा करा .जनतेची दिशाभूल करणे आता तरी सोडा.तुमचे पितळ उघडे पडले आहे.अशा शब्दात शिवसेना नेते अनिल परब यांनी फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील दाव्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
     देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत असा टोला लगावत परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत लगावला. आभासी चित्राला आम्ही थेट उत्तर देत आहोत असं परब यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असं केंद्राने सांगितलं होतं. मात्र तसं काहीही नाही असंही परब यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये असंही परब यांनी स्पष्ट केलं.

गहू, तांदूळ आणि डाळ यांची मदत केंद्राने महाराष्ट्राला केली. १७५० कोटींचे गहू आम्हाला देण्यात आला आहे असा दावा फडणवीस यांनी केला तो खोटा आहे. कारण हे गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाहीत असंही परब यांनी सांगितलं.  स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे असंही अनिल परब यांनी सांगितलं.

भाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. करोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते राजकारण करत आहेत असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत असंही थोरात म्हणाले.करोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. करोनाच्या संकटाशी महाराष्ट्रशी लढतो आहे. २५ मार्च पासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला या लॉकडाउनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणं सुरु आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही खूप मोठी आहे. महाराष्ट्र हे देशाचं व्यवसाय केंद्र आहे. आजही सात लाख लोकांना आपण भोजन देतो आहोत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांची सरकारला करोना काळात मोलाची मदत होते आहे. मुंबईची स्थिती सध्या काळजी करावी अशीच आहे. करोनाच्या संकटातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. मात्र कुणाचीच गैरसोय होऊ नये आपण कार्य करतो आहोत.असे ते म्हणाले.
————————-

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close