Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पोलीस आयुक्तालयास २ अतिरिक्त पोलीस उपआयुक्तांची आवश्यकता आमदार संजय शिरसाट यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

संभाजीनगर (ता.०५) : आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) संभाजीनगर (औ.बाद), पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा) हे दोन पदे निर्माण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

आमदार संजय शिरसाट यांनी निवेदनात म्हटले की, संभाजीनगर (औ.बाद) शहरातील पोलीस आयुक्तालयाचे बहुतांश क्षेत्र हे औद्योगिक व वसाहतीचे, धार्मीक, पर्यटन, शैक्षणिकदृष्ट्या अतिमहत्वाचे क्षेत्र आहे.

हेही वाचा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी

तसेच, येथे औद्योगिक कारखाने दळणवळण साधने, विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, वैद्यकिय उपचार केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत. हे अतिशय झपाट्याने वाढणारे शहर असून या शहरावर पोलीसांचा गुन्हेगारावर वचक रहावा, यासाठी पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा), पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा) ही दोन्ही पदे निर्माण केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

दरम्यान, संभाजीनगर (औ.बाद) शहरात बीबी का मकबरा, पाणचक्की व लगत दौलताबाद, वेरुळ, खुलताबाद, पैठण, अजिंठा असे धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे शहरातील व परिसरातील मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. शहरात उद्योगधंद्यात वाढ होत असल्याने राज्यातील व परराज्यातील मोठा कामगार वर्ग शहरात आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी वाहनांची ये-जा करण्यासाठी वापर होतो आणि अपघाताचे प्रमाण व गुन्ह्यांमध्येही सतत वाढ होत आहे.

हेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

संभाजीनगर (औ.बाद) शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र व्याप्ती, कार्यक्षेत्रामधिल औद्योगिक, स्थलांतरीत लोकसंख्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ, कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होणारे प्रश्न तसेच वाढती वाहतूक समस्या यासर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. या सर्व मुख्य कारणास्तव, (१) पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) शहर-१, (२) पोलीस उपआयुक्त (वाहतुक शाखा)-१ या पदाची पोलीस आयुक्तालयास या २ अतिरिक्त पोलीस उपआयुक्तांची आवश्यकता आहे. या सर्व बाबींचा सहानुभुतिपुर्वक विचार करुन संभाजीनगर (औ.बाद) शहरात असलेल्या पोलीस आयुक्तालयास या २ अतिरिक्त पोलीस उपआयुक्त पदे निर्माण करण्यात यावी, असे आमदार संजय शिरसाट यांनी निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close