राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजन गटात मिळून दिले महाराष्ट्राला सुवर्ण पदक
माजलगाव /रविकांत उघडे
: बिहार राज्यातील पाठणा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तालुक्यातील पुनर्वसन भागातील शहरालगत असणाऱ्या मौजे शेलापूरी येथील पैलवान सुमितकुमार अप्पासाहेब भारस्कर यांनी पंधरा वर्षे वयोगटातील ६८ किलो वजन गटात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशात अव्वल क्रमांक मिळून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.महाराष्ट्र आणि कुस्ती हे एक जिव्हाळ्याच समीकरण मानल जात अश्यातच मराठवाड्यातील बीड जिल्हा हा अतिशय ग्रामीण व ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातून तालुक्यातील शेलापुरी येथील ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर पैलवान अप्पासाहेब भारस्कर व चुलते पैलवान कल्याण भारस्कर यांनी पै.सुमितकुमार यांना कुस्तीचे धडे शिकवले होते .तसेच पैलवान सुमितकुमार भारस्कर हे पुणे येथील रुस्तुम ए हिंद केसरी पै.अमोल बुचुडे व सध्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोबत असणारे आनंद कुमार व नरेंद्र कुमार यांनी प्रशिक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली .सध्या पैलवान सुमितकुमार भारस्कर हे रुस्तुम ए हिंद केसरी पै . अमोल बुचुडे कुस्ती अकादमी पुणे येथे प्रशिक्षण घेत आहेत .या सुवर्ण यशाबद्दल तालुक्यातून सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे
.———————————————-
माजलगावकरांच्या शिरपेचात सुवर्ण पदकाचा तुरा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या शेलापुरी सारख्या शहरालगत असणाऱ्या पुनर्वसित गावातील असणाऱ्या पैलवान अप्पासाहेब भारस्कर यांचा मुलगा म्हणजेच सुवर्ण पदक विजेते पैलवान सुमितकुमार भारस्कर यांनी बिहार येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानी माजलगाव करांच्या शिरपेचात सुवर्ण पदकाच तुरा रोवला असल्याची भावना तालुक्यात पसरली आहे .