Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

दोन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन


परभणी / प्रतिनिधी – राज्यातील सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष व नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाला कोणाचा पायपुस नाही, त्यामुळे येत्या दोन महिन्यांत भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे बोलाताना केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजप महाआघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित बुथ मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष व नेते सत्तेत सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये खुप मतभिन्नता आहे. यातुनच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि भाजपा सत्तेत विराजमान होईल. राज्यातील जनतेला भाजप सारखा पक्ष हवा आहे. हे या निवडणुकीतुन पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही दानवे म्हणाले. यावेळी विविध नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close