Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

जिल्हाधिका-यांनी चक्क मोटरसायकलवर केली रस्त्यांची पाहाणी

ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

नायगाव/ शेषेराव कंधारे 

     वाळू वाहतुकीमुळे कुंटूर सांगवी मेळगाव हा रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने सदर रस्त्यावर पावसाळ्यात तरी वाळू वाहतुक थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी याच्या कडे निवेदनाव्दारे केली होती त्या तक्रारारी ची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन सदरील रस्त्यांची पाहाणी चक्क मोटरसायकलवर करत जनतेशी चर्चा केली असल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. रस्त्यांची पाहाणी करताना आमदार राजेश पवार,बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके,तहसीलदार सुरेखा नांदे उपस्थित होते.


       मेळगाव ता.नायगाव येथे गेल्या वर्षी वाळू घाटाचा लिलाव झाला होता .लिलावातील ठरवून दिलेल्या ब्रास पेक्षा कितीतरी पटीने जास्त वाळू उत्खनन करूण  आजुबाजुच्या शेतात साठविण्यात आली होती .त्यावेळी अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी थेट विभागीय आयुक्ता पर्यंत पोहचल्याने आयुक्ताचे एक पथक मेळगाव सह उमरी तालुक्यातील चार वाळू घाटावर भेट देऊन गेले होते .


        सध्या मेळगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळू  साठा आहे .सदर वाळू वाहतुकीमुळे कुंटूर ते मेळगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे .गेल्या कित्येक वर्षापासून डांबरीकरण रस्ता करण्यात आले नाही वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावरून नागरिकांना वाहन तर सोडाच पण पाई चालणे अवघड झाले आहे या बाबत नागरिकांनी स्वता जिल्हाधिकारी यांच्या कडे  पावसाळ्यात वाळू वाहतुक थांबवा अशी मागणी जनते नी केली त्या तक्रारीची दखल घेत  जिल्हाधिकारी विपनकर व आ.राजेश पवार यांनी  गुरूवारी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान कुंटूर येथे पोहचले कुंटूर हुन स्वता जिल्हाधिकारी व आ.राजेश पवार यांनी सांगवी ,मेळगाव ,धनज रस्त्याची पाहणी केले. व गावक-यांशी चर्चा केले रस्त्याची अवस्था बघुन टिप्पर द्वारे होणारी  वाळू वाहतुक तुर्त  थांबविण्याचे आदेश देत टॅक्ट्रने वाळू वाहतुक सुरू ठेवा असे आदेश जिल्हाधिका-यांनी महसूल अधिका-यांना दिले असल्याचे कळते यावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके , नायगाव च्या तहसीलदार नांदे, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्राजंल पाटील यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close